Parenting Tips: मुलांची बुद्धिमत्ता अतिशय तेज असावी असे वाटते...मग बुद्ध्यांक वाढवण्यासाठी पालकांनी कराव्यात या 5 गोष्टी

IQ level : सर्व पालकांना त्यांच्या मुलांनी हुशार आणि तीक्ष्ण बौद्धिक क्षमतेची असावी अशी इच्छा असते. जेणेकरून त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मात्र यासाठी योग्य वातावरण, योग्य संगोपन, चांगल्या सवयी या सर्व गोष्टींचा सहभाग असतो. मुलांना ज्या वातावरणात आणि ज्या पद्धतीने वाढवले जाते त्याचा त्यांच्या मनावर, बौद्धिक कुवतीवर मोठा परिणाम होत असतो. प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो.

Parenting Tips
मुलांचा आयक्यू वाढवण्यासाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • मुलांकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असावी असे सर्वांनाच वाटते.
  • मुलांना शिकवणे, संगोपन करणे ही अत्यंत गुंतागुंतीची क्रिया आहे
  • ुले हुशार असणे आणि मुलांची बौद्धिक पातळी चांगली असणे यात मोठा फरक आहे

Ways To Boost Kids IQ Level : नवी दिल्ली : मुलांचे संगोपन करणे (Parenting) ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मुलांना ज्या वातावरणात आणि ज्या पद्धतीने वाढवले जाते त्याचा त्यांच्या मनावर, बौद्धिक कुवतीवर मोठा परिणाम होत असतो. आयुष्यात प्रगती करण्यासाठी, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलांकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असावी असे सर्वांनाच वाटते. सर्व पालकांना त्यांच्या मुलांनी हुशार आणि तीक्ष्ण बौद्धिक क्षमतेची असावी अशी इच्छा असते. जेणेकरून त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक आपल्या पाल्याला चांगली शाळा आणि चांगले वातावरण देण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की मुले हुशार असणे आणि मुलांची बौद्धिक पातळी ( IQ Level)चांगली असणे यात मोठा फरक आहे. IQ म्हणजे इंटेलिजेंट कोशंट म्हणजेच बुद्ध्यांक. ही गोष्ट एखाद्या मुलाला इतर मुलांपेक्षा वेगळे बनवते. लहानपणापासूनच काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची आयक्यू पातळी (ways to boost kids IQ level) वाढवता येऊ शकते, असे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे. कसे ते पाहूया. (Parenting tips to increase IQ level of  your child)

अधिक वाचा : 'ही' अभिनेत्री का भडकली कपिल शर्मावर?

लहानपणापासून या गोष्टींची काळजी घ्या- 

  1. -मुलांना प्रेम आणि आदर द्या. त्यांच्यासमोर कधीही अपशब्द वापरू नका किंवा त्यांना मारहाण करू नका.
  2. - मुलांना नैसर्गिक गोष्टी आणि नियमांबद्दल शिकवा आणि त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात अधिकाधिक वेळ घालवू द्या.
  3. जेव्हा मूल प्रश्न विचारू लागते, तेव्हा प्रत्येक प्रश्नाची अचूक आणि शास्त्रीय उत्तरे द्या.
  4. - भूत, प्राणी, गूढ व्यक्ती किंवा इतर कोणत्याही गोष्टीने मुलाला कधीही घाबरवू नका
  5. -मुलांच्या डोळ्यात बघून त्यांच्याशी नेहमी बोला आणि प्रयत्न करा की जेव्हा ते तुमच्याशी बोलतात तेव्हा तेही तुमच्या डोळ्यात बघूनच बोलतील. 

अधिक वाचा : 'या' 3 राशींचं दिवाळीला फळफळणार नशीब,होणार संपत्तीचा वर्षाव

एखादे वाद्य वाजवायला शिका

मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी ही एक उत्तम क्रिया असू शकते. या उपक्रमामुळे मुलांची बुद्ध्यांक पातळी तर वाढतेच शिवाय गणिती कौशल्येही विकसित होतात.त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला गिटार, सितार, हार्मोनियम असे कोणतेही वाद्य वाजवायला शिकवू शकता.

खेळ शिकवा

मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठीही खेळणे आवश्यक आहे. कधी-कधी मुले खेळातून अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे तुमच्या मुलाचा उत्साह आणि IQ पातळी वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्यासोबत खेळले पाहिजे.

गणिताचे प्रश्न सोडवा

मुलाला पाढे खेळायला सांगा किंवा बेरीज-वजाबाकी संबंधित प्रश्न विचारा. दररोज 10 ते 15 मिनिटे असे केल्याने मुलाची IQ पातळी लक्षणीय वाढेल. याशिवाय आजकाल पालकही आपल्या पाल्याची बौद्धिक पातळी विविध पद्धतींचा अवलंब करत आहेत.

अधिक वाचा : तुम्हाला माहितेय रोहित शर्माचं किती झालंय शिक्षण?

खोल श्वास घेणे

खोल श्वास घेणे हे मेंदूसाठी आवश्यक सर्वोत्तम क्रियांपैकी एक आहे. दीर्घ श्वास घेतल्याने चांगले विचार मनात निर्माण होतात. याशिवाय, मुलाची प्रत्येक गोष्टीत लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढवण्याबरोबरच तणावही कमी होतो. यासाठी, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे 10 ते 15 मिनिटे मुलासोबत दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.

मनाचा कस लागणारे खेळ खेळा

मुलांची बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत बुद्धिबळ सारखे मनाला भिडणारे खेळ खेळा. अशा खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास होण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी