Affordable Marriage Options : फुकटात लग्न करण्याचे पर्याय, लाखोंचा खर्चही वाचेल आणि पाहुणेही होतील खूश

लग्न मनासारखं करायचंय आणि ते देखील खर्च न करता? हे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला विचारपूर्वक जागांची निवड करता येऊ शकते.

Affordable Marriage Options
फुकटात लग्न करण्याचे पर्याय  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारतात लग्नासाठी केला जातो सर्वाधिक खर्च
  • पण फुकटात लग्न करणेही शक्य
  • त्यासाठी आहेत अनेक उत्तम पर्याय

Affordable Marriage Options | भारतात लग्नावर जितका खर्च केला जातो, तितकाच कदाचित जगातील इतर कुठल्याच देशात केला जात नसेल. लग्न ही केवळ दोन व्यक्तींची गोष्ट नसते तर दोन परिवार त्यात सहभागी असतात. त्यांचे पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजारी असा सगळा लवाजमा लग्नात सहभागी असतो आणि लग्नमालकाला लाखो रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. अनेकांना लग्न तर थाटामाटात करण्याची इच्छा असते, पण तेवढे पैसे गाठीशी नसतात. अशा लोकांनी आता चिंता कऱण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला जर डोळे उघडून पाहिलं, तर लग्नासाठी असे अनेक पर्याय आहेत, जिथं अगदी मोफत किंवा नाममात्र पैशात लग्न होऊ शकतं. चला जाणून घेऊया, अशाच काही पर्यायांविषयी. 

बाग किंवा मैदान

सार्वजनिक उद्यानं, बागा किंवा मैदानं या ठिकाणी भरपूर मोकळी जागा असते. अशा ठिकाणी जर लग्नाचा विचार केला तर त्यासाठी फारसा खर्च येत नाही. अनेक सार्वजनिक उद्यानं लग्नासाठी मोफत जागा उपलब्ध करून देत असतात. याशिवाय बगिचात असणारी झाडं, नैसर्गिक हिरवळ, झरे, तलाव आणि इतर गोष्टींचा तुम्ही सजावटीसाठी उपयोग करून घेऊ शकता. त्या जागेवर काही तुरळक रचना करून लग्नाची तयारी करता येऊ शकते. निसर्गरम्य आणि हटके जागेत लग्न केल्यावर पाहुणे मंडळीही खूश होऊ शकतात. अर्थात, लग्न असलं तरी त्या जागी रोजच्या रोज फिरायला येणाऱ्या नागरिकांना तुम्ही थांबवू शकत नाही. त्यामुळे गर्दी नसणारी वेळ लग्नासाठी निवडावी. उदाहरणार्थ दुपारच्या वेळी लग्न केलं तर गर्दी कमी होते. 

बीच

समुद्रकिनारा कुणाला आवडत नाही? भारतात असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथं कुठलंही शुल्क न घेता लग्नासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. समुद्राच्या साथीनं लग्न करणं ही कल्पनाच किती रोमँटिक आहे नाही? बीचवर मांडव घालणे, तिथं पाहुण्यांना बोलावणे आणि थाटामाटात लग्न करणे ही कल्पना अनेकांना सुखावणारी आहे. समुद्राच्या लाटांच्या साथीनं आणि अत्यल्प खर्चात लग्न करण्याचा हा पर्याय खूपच चांगला आहे. गोवा, गोकर्ण यासारख्या ठिकाणी अनेक बिचेस ही अशा प्रकारे उपलब्ध करून दिली जातात. 

धार्मिक स्थळं

भारतात अनेक धार्मिक स्थळांवर मोफत विवाह करता येऊ शकतो. जर तुम्ही धार्मिक असाल आणि देवाधर्माच्या साक्षीनं लग्न करण्याची तुमची इच्छा असेल तर अनेक मंदिरं, चर्च आणि मठांचे पर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणांवर लग्न कऱण्यासाठी तुम्हाला काहीही खर्च येणार नाही. 

शाळा किंवा महाविद्यालयं

तुम्ही ज्या वास्तूमध्ये शिकलात, एकमेकांची ओळख करून घेतलीत, त्याच वास्तूमध्ये विवाहबंधनात अडकण्याची कल्पना फारच उदात्त आहे. तुमचे शिक्षक किंवा प्राध्यापकही या लग्नाला हजर राहू शकतात. शाळांची मैदानं किंवा छतावर लग्न करता येऊ शकतं. त्यातही शाळांना सुट्टी असताना किंवा विकेंडला जर लग्नाचा मुहूर्त ठेवला, तर विद्यार्थ्यांना अजिबात डिस्टर्ब न करता लग्न पार पडू शकेल. 

हिल स्टेशन

निसर्गाची आणि डोंगरदऱ्यांची आवड असणारे वेगवेगळ्या हिल स्टेशनचा पर्याय लग्नासाठी निवडू शकतात. त्यासाठी महागड्या आणि गर्दीच्या हिलस्टेशनऐवजी परवडणाऱ्या आणि अनवट ठिकाणी जाऊन लग्नाची गाठ तुम्ही बांधू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी