Vastu Tips: या दिशेला फ्रीज ठेवल्याने झपाट्याने व्हाल श्रीमंत; नशीबही चमकेल 

लाइफफंडा
Updated May 11, 2022 | 11:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips । घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनांवर मोठा प्रभाव पडत असतो. घरातील कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या गोष्टी आपल्या आनंदावर परिणाम करतात. सर्वांच्या घरात फ्रीज असतो.

Placing a refrigerator in this direction brings wealth to the house 
या दिशेला फ्रीज ठेवल्याने झपाट्याने व्हाल श्रीमंत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनांवर मोठा प्रभाव पडत असतो.
  • घरातील कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
  • वास्तुशास्त्रानुसार फ्रिज नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu Tips । मुंबई : घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनांवर मोठा प्रभाव पडत असतो. घरातील कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या गोष्टी आपल्या जीवनातील आनंदावर परिणाम करतात. सर्वांच्या घरात फ्रीज असतो. वास्तुशास्त्रानुसार, फ्रीजची देखभाल करणे देखील खूप महत्वाचे आहे आणि ते कोणत्या दिशेने ठेवावे याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. (Placing a refrigerator in this direction brings wealth to the house). 

अधिक वाचा : हे दोन फोटो घेतील तुमच्या बुद्धीची परीक्षा

आजारही घरापासून राहतात दूर 

वास्तुशास्त्रानुसार फ्रीज व्यवस्थित ठेवल्यास घरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. असे केल्याने आजारही घरापासून दूर राहतात. चला तर म जाणून घेऊया फ्रीज नेमका कोणत्या दिशेला ठेवल्याने फायदा होतो. 

फ्रीज नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावा

वास्तुशास्त्रानुसार फ्रिज नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते. फ्रीज विजेवर चालत असल्याकरणाने आग्नेय कोनात म्हणजेच दक्षिण आणि पूर्व कोनात ठेवता येतो. फ्रिजचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास ते शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील धनाची हानी होत नाही. वास्तूनुसार फ्रिज दक्षिण दिशेला ठेवू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी