नववर्ष २०२१ - स्मार्टफोन, फिटनेस बँडसह या ५ वस्तू खरेदी करण्याचा करा प्लान

लाइफफंडा
Updated Dec 31, 2020 | 13:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

नवे वर्ष अवघ्या काही तासांवर राहिले आहे. या निमित्ताने तुम्ही काही प्रॉडक्ट खरेदी करू शकता जे घरात तुम्ही वापरू शकता. 

smartphone
स्मार्टफोन, फिटनेस बँडसह या ५ वस्तू खरेदीचा बनवा प्लान 

थोडं पण कामाचं

  • अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.
  • oraimo Tempo 2S फिटनेस बँडमध्ये ०.९६ इंचाचा आयपीएस कलर एचडी डिस्प्ले आहे. या
  • नव्या वर्षात हॅवल्स फ्रेशिया एअर प्युरिफायरच्या रेंजसह आपल्या घराला प्रदूषणुक्त बनवा.

मुंबई: नवे वर्ष(new year) फक्त काही तासांवर येऊन ठेपले आहे. नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत तुम्ही आहात. या निमित्ताने तुमचा काही खरेदीचा(shopping) प्लान झाला असेल. अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता. itel A48 स्मार्टफोन, oraimo Tempo 2S फिटनेस बँड, हॅवल्स फ्रेशिया एअर प्युरिफायर रेंज, हॅवल्स डेस्कलाईट किटिलाई 7 W 4 K BLU टेबल माऊंटेड आणि हॅवल्स पेनेलोप पेंडंट 1LS E27 D300 RED खरेदी करू शकता. 

itel A48:itel A48 ची स्क्रीन १५.४९ सेमी(६.१ इंच) एचडी प्लस आयपीएस वॉटरड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले आहे तसेच २.५ डीटीपी लेंस चांगली स्क्रीन प्रदान करते. लेटेस्ट अँड्रॉईड १०(गो अॅडिशन)वर चालणाऱ्या आयटेल A48मध्ये १.४ गिगाहर्टचा क्वाड कोर प्रोसेसर लावला आहे ज्यामुळे यात मल्टीटास्किंगची सुविधा मिळते. मेमरी कॉन्फिगरेशनमध्ये हा फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. ही मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन ड्युअल ५ एमपी रेयर कॅमेरा., एलईडी फ्लॅश आणि ५ एमरी सेल्फी कॅमेऱ्याने युक्त आहे. कमी प्रकाशातही यामध्ये चांगले फोटो निघतात. सिनेमासारखी क्वालिटी व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी यात १९.५:९ आस्पेक्ट रेशो आणि १५६०x७२० रिझोल्युशन आहे. यात फास्ट फेस अनलॉक आणि मल्टी फंक्शनल फिंगरप्रिंट सेन्सॉर आहे. हा स्मार्टफोन ग्रेडिएंट ड्युअल टोन बॅक कल फिनिश तसेच ग्रेडेशन ग्रीन, ग्रेडेशन पर्पल आणि ग्रेडेशन ब्लॅकमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत, ५,९९९ रूपये इतकी आहे. 

oraimo Tempo 2S fitband :oraimo Tempo 2S फिटनेस बँडमध्ये ०.९६ इंचाचा आयपीएस कलर एचडी डिस्प्ले आहे. या फिटनेस बँडला IP67 ची रेटिंग मिळाली आहे. याचा अर्थ हा हँड डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. याशिवाय यात Tempo 2Sमध्ये हार्ट मॉनिटर करणारे सेन्सॉर पासून ते कॉल मेसेज नोटिफिकेशनची सुविधा आहे. कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाल्यास युजर्सला Tempo 2S  फिटनेस बँडमध्ये ब्लूटू ५.० यासोबतच या स्ट्रॅपमध्ये बिल्ट इन यूएसबी पोर्ट मिळेल. या फिटनेस बँडमध्ये 85mAhची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्जिंग केल्यास २० दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो. याची किंमत १,४४९ रूपये इतकी आहे. 

हॅवल्स फ्रेशिया एअर-प्युरिफायर रेंजः नव्या वर्षात हॅवल्स फ्रेशिया एअर प्युरिफायरच्या रेंजसह आपल्या घराता प्रदूषणुक्त बनवा. यात स्मार्ट टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात १० स्टेज फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. ज्यामुळे घरात ताजी तसेच आरोग्यदायी हवा खेळती राहते. यात स्टँडर्ड प्री फिल्टर, अँटी बॅक्टेरियल, एनियॉन प्रोड्युसर, कोल्ड कॅटलिस्ट, याशिवाय ह्युमिडिफायर, अॅक्टिव्हेटेड कार्बन, स्टरलायजिंग यूव्ही लाईट आणि अँटी बॅक्टेरियल्स बॉल्सही आहे. हा एअर प्युरिफायर रूमच्या तापमानालाही अॅडजस्ट करण्याचे काम करते. तसेच त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवतो. याच रेंजची किंमत १५,९५० रूपयांपासून ते ३७,९९५ रूपये इतकी आहे. 

हॅवल्स पेनेलोप पेंडेंट 1LS E27 D300 RED: हॅवल्,च्या होम आर्ट लाईट्सच्या रेंजमध्ये सुंदरतेने डिझाईन करण्यात आलेल्या डेकोरेटिव्ह लायटिंग फीचर्सचा समावेशआहे. हे लायटिंग फिक्चर्स ज्यारूममध्ये लागतील तेथील साज तसेच सज्जा यांची शोभा वाढेल. तुम्ही हे चालू ठेवा अथवा बंद याची सुंदरता नेहमीच ऑन राहील. लायटिंग फिक्च४सला वीजेची बचत करणाऱ्या दिव्यांसोबत लावले जाते. या पेंड्ट लाईट्समध्ये धातूवर विशेष डिझाईन करण्यात आली आहे. याची किंमत ८,९२५ रूपये इतकी आहे. 

हॅवल्स डेस्कलाइट किटिलाइट 7 W 4 K BLU-टेबल माउंटेडः हॅवल्सची ही आकर्षक लाईट छोट्यांच्या मांजरीच्या डिझाईनमध्ये सादर करण्यात आली आहे. तुमच्या स्टडी रूम अथवा होम ऑफिससाठी आद४स आहे. या लाईटमध्ये टच बेस ऑन/ऑफ स्विच आहे. यात अॅडजस्टेबेल लॅम्प शेड आहे. याची किंमत ३,१४० रूपये इतकी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी