Holi Skincare Tips, Holi Pre & Post Skin Care 2023 in Marathi : होळीआधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

Pre Holi Skincare Tips In Marathi, Post Holi Skincare Tips In Marathi : रंगांमधील रसायनांमुळे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची ते जाणून घ्या....

Holi Skincare Tips
होळीआधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी जाणून घ्या टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • होळीआधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स
  • रंगांमधील रसायनांमुळे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते
  • धोका टाळण्यासाठी घ्या काळजी

Pre Holi Skincare Tips In Marathi, Post Holi Skincare Tips In Marathi : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार सोमवार 6 मार्च 2023 रोजी होळी, मंगळवार 7 मार्च 2023 रोजी धूलिवंदन आणि रविवार 12 मार्च 2023 रोजी रंगपंचमी आहे. पण अलिकडे अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी मर्यादीत प्रमाणात आणि धूलिवंदनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंग खेळण्याची पद्धत रूढ झाली आहे. धूलिवंदनाच्या दिवसालाच अनेकजण होली किंवा होळी म्हणू लागले आहेत. रंग खेळण्याच्या निमित्ताने भेटीगाठी होत आहेत. सण साजरा होत आहे. यावेळी वाजवी दरात मिळणारा सिंथेटिक गुलाल आणि सिंथेटिक रंग वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुलाल आणि रंगांमधील रसायनांमुळे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची ते जाणून घ्या....

रंग खेळण्याआधी अशी घ्या त्वचेची काळजी (Pre Holi Skincare Tips In Marathi)

  1. चेहरा, हात, पाय पाण्याने स्वच्छ धुवा. टॉवेल वापरून त्वचा कोरडी करून घ्या. नंतर चेहऱ्याच्या तसेच हातापायांच्या त्वचेला नारळाचे तेल (खोबरेल तेल) लावा. 
  2. रंग खेळण्याच्या किमान 30 मिनिटे आधी त्वचेला नारळाचे तेल (खोबरेल तेल) लावून हायड्रेट केले आणि नंतर रंग खेळले तर त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते.
  3. रंग खेळण्यासाठी जाताना डोक्यावरील केसांना नारळाचे तेल (खोबरेल तेल) लावा. यामुळे रंग खेळताना डोक्यावरील केसांचे रक्षण होईल.
  4. रंग खेळण्यासाठी जाण्याआधी ओठांना लीप बाम लावा. यामुळे रंग खेळताना ओठांचे रक्षण होईल.
  5. रंग खेळण्यासाठी जाण्याआधी हातापायाची नखे कापा. नंतर नखांना नेलपॉलिश लावा. यामुळे रंग खेळताना नखांचे रक्षण होईल.
  6. रंग खेळण्यासाठी जाताना चष्मा किंवा गॉगल वापरा. यामुळे रंग खेळताना डोळ्यांचे रक्षण होईल.
  7. शक्यतो वापरून जुने झालेले आणि रंग खेळून झाल्यावर फेकून देता येतील असे कपडे परिधान करा.

रंग खेळल्यानंतर अशी घ्या त्वचेची काळजी (Post Holi Skincare Tips In Marathi)

  1. रंग खेळून आल्यानंतर शरीराच्या ज्या भागाला रंग लागला आहे तो भाग आधी साध्या पाण्याने धुवा आणि शक्य तेवढा रंग सहजतेने  काढण्याचा प्रयत्न करा. 
  2. आंघोळीचा साबण आणि पाणी यांच्या मदतीने शरीराला लागलेला रंग काढून टाका. 
  3. शाम्पू वापरून केस धुवा आणि केसांना लागलेला रंग काढा.
  4. फोमिंग फेसवॉशने चेहऱ्याच्या त्वचेला हलका मसाज करा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्याला लागलेला रंग काढा.
  5. नारळाच्या तेलात (खोबरेल तेलात) बुडवलेला कापसाचा बोळा (कॉटन बॉल) संपूर्ण चेहऱ्यावर हकल्या हाताने फिरवा. यानंतर पुन्हा फोमिंग फेसवॉशने हलका मसाज करत चेहरा धुवा आणि चेहऱ्याला लागलेला रंग काढा.
  6. रंग काढल्यानंतर त्वचेला हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावा.
  7. रंग काढल्यानंतर चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन, हळद, मध, दही, चंदन पावडर, ग्रीन टी हे घटक वापरून तयार केलेला घरगुती फेसपॅक चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक 30 ते 40 मिनिटांनंतर पाण्याने धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी