‘गर्भवती झाल्यास नोकरदार महिलांना असते ही भीती’

लाइफफंडा
Updated Apr 22, 2019 | 16:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

नोकरदार महिलांना गर्भवती असल्यास एका गोष्टीची खूप भीती राहते, ती म्हणजे त्यांची नोकरी जाण्याची... जाणून घ्या या बातमीतून यामागचं कारण...

Pregnant Woman
गर्भवती महिलांना ही भीति  |  फोटो सौजन्य: IANS

न्यूयॉर्क: महिलांना दैवानं दिलेली एक अमूल्य भेट म्हणजे ‘आई’ होणं होय. मात्र अनेक नोकरदार महिलांना आपण गर्भवती झाल्यास त्यांची नोकरी जाण्याची भीती वाटते. वडील झाल्यानंतर पुरुषांना नेहमी नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळते. पण महिलांना कामावरून काढून टाकू शकतात, असं निष्कर्ष काही शोधकर्त्यांनी काढला आहे. संशोधनाशी निगडित हा निष्कर्ष इम्प्लॉईड मनोविज्ञानच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात आई होणाऱ्या महिलांना आपल्या ऑफिसमध्ये आता त्यांचं चांगलं स्वागत केलं जाणार नाही, असं वाटत असतं. हे या जर्नलमध्ये सांगण्यात आलं होतं.

फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचं म्हणणं आहे की हे त्या महिलांवर केलं गेलेलं पहिलं अध्ययन आहे. ज्यांना असं वाटतं की, गर्भावस्थेदरम्यान त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जावू शकतं. मॅनेजमेंटचे सहाय्यक प्राध्यापक पुस्टियन अंडरडॉल यांनी सांगितलं, ‘आम्हाला आढळलं महिलांनी जेव्हा आपण गर्भवती असल्याचं जाहीर केलं तेव्हा ऑफिसमध्ये त्यांना प्रोत्साहन जरा कमी प्रमाणात मिळाल्याचं जाणवलं.’

पुस्टियन पुढे सांगतात, जेव्हा महिलांनी आपल्या गर्भवती असल्याची माहिती मॅनेजर किंवा सहकाऱ्यांना दिली तेव्हा त्यांना कामात अधिक जबाबदारी आणि करिअरबाबत प्रोत्साहन देण्यात कमतरता आली. जेव्हा की पुरुषांना प्रोत्साहित करण्याच्या दरात वाढ झाली.

सिंद्धांतांवर खोलवर अभ्यास

निष्कर्षावर पोहोचण्यासाठी पुस्टियन यांनी दोन सिंद्धांतांवर खोलवर अभ्यास केला. पहिले हे बघितलं गेलं की, गर्भवती महिलांना नोकरीवरून काढून टाकलं जाण्याची भीती असते आणि दुसऱ्यामध्ये महिलांना हे असं वाटण्याचं कारण म्हणजे गर्भावस्थेत त्यांच्या खाजगी आयुष्यात आणि करिअरच्या क्षेत्रात अनेक बदल झाले असतात, हे जाणवलं. संशोधनात आणखी अनेक नवीन बाबी सांगितल्या गेल्या आहेत. गरोदर महिलांनी आपल्या कामाच्या ठिकाणी कसं राहावं, हे सुद्धा यात सांगितलंय.

प्रोत्साहन मिळायला हवे

पुस्टियन यांच्या मते, ‘आई होणाऱ्या महिलांबाबत करिअरशी निगडित प्रोत्साहन कमी केलं जायला नको. यासोबतच मॅनेजरनं आई वडील दोघांनाही सामाजिक आणि करिअरच्या दृष्टीनं प्रत्येक बाबतीत शक्य तेवढी मदत करायला पाहिजे, जेणेकरून काम आणि कुटुंबाशी निगडित जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावू शकण्यास मदत मिळेल.’

हे संशोधन न्यूयॉर्कमधील असलं तरी भारतातही गर्भवती महिलांची मानसिकता काही वेगळी नसते. नोकरी आणि कुटुंब सांभाळतांना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. बाळाच्या जन्मानंतर नोकरी करता येईलच, असं नाही. महिलांना आपल्या करिअरमध्ये असतांना या सर्व बाबींचा विचार करावा लागतो.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...