Propose Day Shayari in Marathi: व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली आहे. हा पूर्ण आठवडा तरुण-तरुणींसाठी खूपच खास असतो. प्रत्येक जोडप्यासाठी व्हॅलेंटाईन वीक हा एखाद्या उत्सवाप्रमाणेच असतो. तुम्ही कुणावर तरी प्रेम करता आणि त्याच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करु इच्छित असाल तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.
जे कपल आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त करणं खूपच सोपं असतं. मात्र, ज्यांना प्रथमच आपल्या क्रश समोर प्रेम व्यक्त करायचं आहे त्यांच्यासाठी थोडं अवघडंच असतं. तुम्ही सुद्धा जर प्रथमच प्रेम व्यक्त करत असाल तर तुम्ही सुंदर शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करुन प्रपोज करु शकता. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या शायरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.