Ahilyabai Holkar Jayanti 2022 Wishes In Marathi: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त WhatsApp, Instagram, Facebook आणि Social Media वर शेअर करा मराठी शुभेच्छा

 आज मंगळवार, ३१ मे २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. अहिल्याबाई यांचा जन्म अहमदनगर येथील चौंडी तालुक्यात झाला. वयाच्या ८व्या वर्षी अहिल्याबाई यांचे लग्न मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेरावाशी झाले. अवघ्या २८ व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या. तेव्हा अहिल्याबाई यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना प्रजाहितासाठी सती जाण्यापासून रोखले तसेच हे राज्य तुम्हालाच सांभाळायचे आहे असे मल्हारराव म्हणाले.

Ahilyabai Holkar
अहिल्याबाई होळकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज मंगळवार, ३१ मे २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे.
  • अहिल्याबाई यांचा जन्म अहमदनगर येथील चौंडी तालुक्यात झाला.
  • त्यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा

Ahilyabai Holkar Jayanti 2022 : मुंबई : आज मंगळवार, ३१ मे २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. अहिल्याबाई यांचा जन्म अहमदनगर येथील चौंडी तालुक्यात झाला. वयाच्या ८व्या वर्षी अहिल्याबाई यांचे लग्न मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेरावाशी झाले.

अवघ्या २८ व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या. तेव्हा अहिल्याबाई यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना प्रजाहितासाठी सती जाण्यापासून रोखले तसेच हे राज्य तुम्हालाच सांभाळायचे आहे असे मल्हारराव म्हणाले. त्यानंतर अहिल्याबाई यांनी राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव मोहिमेवर असताना अहिल्याबाई राजकारभार पहायच्या.

मल्हारराव होळकरांना इंदूर संस्थानची जहागिरी देण्यात आली होती. त्यानंतर १७६६ साली मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण जवबादारी अहिल्याबाई यांच्यावर येऊन पडली. त्यांनी लोकहितासाठी अनेक निर्णय घेतले. कर संकलन आणि सारा वसुलीत बदल केले, अनेक मंदिरांचा जीर्णोध्दार केला,अनेक पवित्र स्थळांची डागडुजी केली, गोरबरिबांना दान केले, चोर लुटारुंचा बंदोबस्त केला. या कामगिरीमुळे  भारतीय इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार्‍या मराठी संदेश आणि शुभेच्छा शेअर करा. 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी