Kitchen Tips : स्वयंपाकघरात या दिशेला स्टोव्ह ठेवा, घर श्रीमंतीने भरलेले असेल, गरिबी कधीच येणार नाही

लाइफफंडा
Updated Dec 28, 2021 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kitchen Tips : घरातील प्रत्येक खोली ही योग्य दिशेने असणं आवश्यक आहे.वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार वस्तू असल्यास खूप फायदा होतो.

Kitchen architecture, tips and much more
स्वयंपाकघरातील वास्तूशास्त्र, टिप्स आणि बरचं काही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वयंपाकघरातील वास्तू शास्त्र आणि टिप्स
  • स्वयंपाकघर, स्नानगृह योग्य दिशेने असणं गरजेचे आहे.
  • स्वयंपाकघरातील वस्तू योग्य जागी असल्याने घरात सुख-समृद्धी नांदते


Kitchen Tips update : नवी दिल्ली : घर बनवताना प्रत्येक खोली, स्वयंपाकघर, स्नानगृह योग्य दिशेने असणे आवश्यक आहे, परंतु घरात ठेवलेल्या वस्तूही वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार असाव्यात. जर या गोष्टी वास्तूनुसार असतील तर त्यांच्यापासून मिळणारे शुभ परिणाम जीवनावर होतात. घर सुख-समृद्धीने भरून जाते. या गोष्टींमध्ये गॅस स्टोव्हला खूप महत्त्व आहे कारण त्यावर दररोज अन्न शिजवले जाते आणि म्हणूनच स्टोव्हला खूप महत्त्व आहे. याशिवाय फ्रिज, ओव्हन, मिक्सर आदी वस्तूही वास्तूनुसार योग्य ठिकाणी ठेवाव्यात.

Kitchen Gas stove: Four burner stoves for enthusiastic cooks | Most Searched Products - Times of India

वास्तूनुसार गॅसची शेगडी अग्निदेवाच्या दिशेला असावी, यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पूर्व ही अग्नीची दिशा आहे. स्टोव्ह या दिशेला अशा प्रकारे ठेवावा की अन्न शिजवणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे असावे. मायक्रोवेव्ह, हीटरही याच दिशेने ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आगीशी संबंधित अपघातांचा धोकाही कमी होतो.

French Door Refrigerators That Give A High-End Look To Your Kitchen | Most Searched Products - Times of India

त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर ठेवण्याची योग्य जागा पश्चिमेला आहे. हे ठिकाण पाणी ठेवण्यासाठीही उत्तम आहे.

Single bowl kitchen sinks that are just perfect for small-spaced kitchens | Most Searched Products - Times of India


स्वयंपाकघरात वॉशबेसिन किंवा सिंक बनवण्याची योग्य जागा ईशान्य आहे.

Toasters: How To Use A Toaster For Crisp & Tasty Bread? | Most Searched Products - Times of India


मिक्सर-टोस्टर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातही वेगळी जागा असावी. यासाठी स्वयंपाकघराची उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण दिशा उत्तम आहे.

How to make your kitchen environment friendly | The Times of India

खूप प्रयत्न करूनही स्वयंपाकघरातील वास्तूदोष दूर होत नसतील तर स्वयंपाकघरात आग्नेय दिशेला लाल दिवा लावावा. स्वयंपाकघरातील अनेक वास्तूदोष दूर करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी