Stylish accessories : पंजाबी सूटसोबत या ऍक्सेसरीज केसांमध्ये लावा, तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल

Stylish accessories: जर तुम्हाला पंजाबी सूट घालण्याची आवड असेल, तर तुमचा लूक अधिक स्टायलिश बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांमध्ये या वेगवेगळ्या ऍक्सेसरीज घालू शकता.

Put these accessories in the hair along with the Punjabi suit, you will get the perfect look
वेअर स्टाइलिश, आणि लूक स्टाइलिश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंजाबी सूटसोबत वापरा या अँक्सेसरीज
  • पंजाबी सूट, आणि पंजाबी लूक
  • परफेक्ट पंजाबी कु़डी, तुसी छा जाओगे

Stylish accessories : सलवार कमीज, पंजाबी सूट हा असा ड्रेस आहे जो तुम्ही कुठेही घालू शकता. कौटुंबिक कार्यांपासून ते मित्रांसोबत हँग आउट करण्यापर्यंत, पंजाबी सूट प्रत्येक प्रसंगी सूट करतात. पण स्त्रीया पंजाबी सूटवर तेव्हाच छान दिसतात जेव्हा त्यांचा संपूर्ण लुक पंजाबी टचमध्ये असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लुक अधिक स्टायलिश करायचा असेल. किंवा पंजाबी सूटवर पंजाबी टच द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या केसांवर काही स्टायलिश ऍक्सेसरीज ट्राय करू शकता.

Tania doles out proper Punjaban goals in her latest pictures


फुलांनी केस सजवा

5 gorgeous bridal hairstyles with fresh flowers - Times of India


पंजाबी लुक मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांमध्ये फुले माळू शकता. तुम्ही ताजी चमेली, गुलाब, ऑर्किड किंवा असे कोणतेही आकर्षक फूल केसाव लावू शकता. हवे असल्यास तुम्ही बाजारात मिळणारी आर्टिफिशीयल फुलेही वापरू शकता. तुमची वेणी अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही फुलांचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही लग्नात पंजाबी सूट परिधान करता तेव्हा या ऍक्सेसरीजचा वापर करा. आपण आर्टिफिशीयल फुले वापरू शकता कारण ते बराच काळ टिकतात आणि आपण ते अनेकदा वापरुही शकता.

गंगावन वापरा


पंजाबी सूटसोबत कंबरेपर्यंत आलेली वेणी खूपच छान दिसते. पण पंजाबी सूट घालणाऱ्या प्रत्येक महिलेचे केस लांब असतीलच असे नाही. काही स्त्रीयांचे केस लहान असतात आणि पंजाबी सूटवर लहान वेण्या फारशा छान दिसत नाहीत. तुमचे केस लहान असल्यास, केस लांब दिसण्यासाठी तुम्ही गंगावन वापरू शकता. आपण गंगावन वापरताना ते अधिक आकर्षकही करू शकता. किंवा साधी वेणीही घालू शकता.  तसेच, वेणी अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या डिझाइन्स बाजारात सहज मिळतील. तसेच, वेणीच्या वर तुम्ही मोती, स्टोन किंवा चकाकणारे स्टोन्सही लावू शकता. या ऍक्सेसरीज तुम्हाला पंजाबी सूटवर परफेक्ट लुक देतील.


हेअर चेनचा वापर करा


जर तुम्हाला पंजाबी सूटवर तुमचा लुक अधिक स्टायलिश बनवायचा असेल तर तुम्ही तुमचे केस अधिक आकर्षक बनवू शकता.  तुम्ही तुमच्या केसांमध्ये पेंडेंटसह लेयर्ड किंवा साध्या चेन वापरू शकता. जर तुमच्याकडे हेअर चेन नसेल, तर तुम्ही तुमचा नेकलेस हेअर ऍक्सेसरी म्हणून वापरू शकता.ही हेअर चेन तुमच्या केसांना लावण्यासाठी तुम्हाला काही पिन्स लागतील. मदतीने तुम्ही हेअर चेन सहजपणे तुमच्या केसांमध्ये लावू शकता. 
याशिवाय जर तुमची हेअरस्टाईल थोडी साधी असेल तर तुम्ही हेअर चेन वापरू शकता.


स्टाइलिश ब्रोच किंवा पिन वापरा

Hair accessories that are a must for a bride to be | Most Searched Products  - Times of India

जर तुम्ही पंजाबी सूटवर फ्रेंच पोनीटेल बांधण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पोनीटेलच्या बाजूला म्हणजे डोक्याच्या दोन्ही बाजूला स्टायलिश ब्रोच किंवा पिन वापरू शकता. बेज्वेल्ड हेअर ब्रोच वापरून तुम्ही तुमचा लुक स्टायलिश करु शकता. कारण हा ब्रोच तुमच्या संपूर्ण लुकला पंजाबी टच देईल. 
शिवाय, ही केसांची सर्वात सोपी ऍक्सेसरीज आहे जी तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः वापरू शकता. अगदी लहान ब्रोचही तुमच्या साधारण हेअर स्टाईलला अधिक खूलवू शकतो. याशिवाय केसांना स्टायलिश लूक देण्यासाठी तुम्ही पेंडंटचाही वापर करू शकता. तेव्हा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने पंजाबी सूट घालण्याचा विचार करत असाल तर स्टायलिश लुक मिळवण्यासाठी तुम्ही या ऍक्सेसरीज ट्राय करु शकता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी