Vastu Tips For Wall Clock: घरात 'या' दिशेला लावा घड्याळ, नशीब चमकायला लागणार नाही वेळ

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Nov 13, 2022 | 13:30 IST

Right Direction to Place Wall Clock: सर्व घरांमध्ये भिंतीवर घड्याळ असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की भिंतीवरील घड्याळ एखाद्याचे नशीब बनवू शकते तसेच बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगत आहोत.

Vastu Tips For Wall Clock
नशीब चमकावायचे आहे का? मग घरात 'या' दिशेला लावा घड्याळ 
थोडं पण कामाचं
  • घरांमध्ये भिंतीवर घड्याळ असणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
  • वास्तुशास्त्रामध्ये (Vaastu Shastra) भिंतीवर असलेल्या घड्याळाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
  • ज्याचे पालन केल्याने कोणत्याही व्यक्तीचे भाग्य सुधारले जाऊ शकते आणि न पाळल्यास नशीबही खराब होऊ शकते.

मुंबई: Wall Clock and Vastu Shastra: घरातील भिंतीवर लावलेले घड्याळ सर्व लोकांना वेळ सांगण्याचे काम करते हे सर्वांना माहित आहे. भिंत घड्याळ लोकांच्या भवितव्याबद्दल अनेक संकेत देते हे लोकांना फारसे माहित नसले तरी, वास्तुशास्त्रामध्ये (Vaastu Shastra)  भिंतीवर असलेल्या घड्याळाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्याचे पालन केल्याने कोणत्याही व्यक्तीचे भाग्य सुधारले जाऊ शकते आणि न पाळल्यास नशीबही खराब होऊ शकते. वॉल क्लॉकशी संबंधित अशाच वास्तु उपायांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ.

वास्तूनुसार घड्याळ कोणत्या दिशेला ठेवावे?

सर्वप्रथम भिंतीचे घड्याळ कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे हे जाणून घ्या. हे जाणून घेतल्यावरच आपण भिंतीवरील घड्याळाशी संबंधित वास्तु उपायांचा लाभ घेऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही खोलीत भिंतीवर घड्याळ (Vastu Tips for Wall Clock) लावणार असाल तर त्यासाठी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशा खूप शुभ मानली जाते. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर या 3 दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला भिंतीवर घड्याळ लावण्याचा प्रयत्न करा.

अधिक वाचा-  चेहऱ्याच्या मसाजसाठी वापरा 'या' प्रकारचे तेल, Skin करेल Glow

निळे काळ्या रंगाचं घड्याळ लावू नये

वास्तुशास्त्रानुसार, निळ्या किंवा काळ्या रंगाचे भिंतीवरील घड्याळ चुकूनही घरात लावू नये. हे दोन्ही रंग अशुभ आणि डोळ्यांना त्रासदायक मानले जातात. हे देखील लक्षात ठेवा की वॉल क्लॉक (Vastu Tips for Wall Clock)  बाल्कनीमध्ये कधीही लावू नयेत, तसेच प्रत्येक खोलीत आणि व्हरांड्यात भिंतीवरील घड्याळ लावू नये. त्याऐवजी ते घराच्या एक किंवा दोन मुख्य ठिकाणी ठेवणे चांगले आहे.

चौकोनी घड्याळ बसवणे टाळा

वास्तू तज्ज्ञांच्या मते, चौकोनी आकाराचे घड्याळ (Vastu Tips for Wall Clock) घरात कधीही लावू नये. तुमच्या बेडरूममध्ये चुकूनही पेंडुलम घड्याळ लावू नये. जर काही कारणास्तव घड्याळ खराब झाले असेल किंवा त्याचे सेल खराब झाले असतील तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा. भिंतीवर बंद पडलेले घड्याळ अशुभ मानले जाते. म्हणूनच ते सतत सुरू ठेवण्याचा प्रयत्न असला पाहिजे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी