Veg Pulao Recipe: अचानक घरी जेवायला पाहुणे आले तर गडबडून जाऊ नका, झटपट बनवा टेस्टी व्हेज पुलाव

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 30, 2022 | 15:20 IST

Easy Veg Pulao Recipe In Marathi:आज आम्ही तुम्हाला एक झटपट आणि टेस्टी होणाऱ्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत. ही रेसिपी (Recipe) खायला खूप चविष्ठ लागते आणि तुमच्या पाहुण्यांना खूप आवडेल नक्की.

Simple Veg Pulao Recipe In marathi
झटपट आणि पटापट टेस्टी व्हेज पुलाव  
थोडं पण कामाचं
 • अचानक जेवायला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट आणि पटापट टेस्टी असा व्हेज पुलाव तुम्ही बनवू शकता.
 • व्हेज पुलाव खायला खूप चविष्ट लागतो. पुलाव फक्त 30 मिनिटांत तयार होतो.
 • तुम्हाला हवे असल्यास ते पॅक करून मुलांना टिफिनमध्ये ही देऊ शकता.

नवी दिल्ली: Simple Veg Pulao Recipe In Marathi: बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरी अचानक कोणी तरी पाहुणे (Guest) येतात. आणि हे पाहुणे जेवून जाण्याचा बेत करतात. त्यामुळे अशावेळी अचानक काय जेवण बनावयाचं असा गोंधळ उडतो. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला एक झटपट आणि टेस्टी होणाऱ्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत. ही रेसिपी (Recipe) खायला खूप चविष्ठ लागते आणि तुमच्या पाहुण्यांना खूप आवडेल नक्की. म्हणून अचानक जेवायला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट आणि पटापट टेस्टी असा व्हेज पुलाव तुम्ही बनवू शकता.  (Simple and easy Veg Pulao tasty Recipe In Marathi)

व्हेज पुलाव खायला खूप चविष्ट लागतो. पुलाव फक्त 30 मिनिटांत तयार होते. त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या टाकू शकता. या पुलावची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही एक अतिशय अष्टपैलू पाककृती आहे. तुम्हाला हवे असल्यास ते पॅक करून मुलांना टिफिनमध्ये ही देऊ शकता. किंवा घरी कोणी पाहुणे आले तर तुम्ही ते बनवून त्यांनाही देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची रेसिपी.

अधिक वाचा- महिन्याला इतके कमवते मौनी रॉय,आकडा बघून व्हाल आश्चर्यचकित

साहित्य

व्हेज पुलाव बनवण्यासाठी तुम्हाला तूप, जिरे, चक्र फूल, दालचिनी, लवंग, तमालपत्र, काजू, कांदा, आले लसूण पेस्ट, मिरची, टोमॅटो, बटाटा, गाजर, मटार, फ्लॉवर, पनीर, बीन्स, कोथिंबीर आणि बारीक चिरून घ्यावे लागेल. चिरलेला पुदिना, लिंबाचा रस, बासमती तांदूळ, मीठ आणि गरम मसाला आवश्यक आहे.

व्हेज पुलाव बनवण्याची कृती 

 • हा पुलाव बनवण्यासाठी प्रथम प्रेशर कुकरमध्ये तूप टाका.
 • गरम झाल्यावर त्यात जिरे,चक्र फूल, दालचिनी, लवंग, तमालपत्र टाका. 
 • यानंतर त्यात चिरलेला कांदा आले लसूण पेस्ट, मिरच्या घाला.
 • हे मिश्रण आता थोडा वेळ फ्राय करून घ्या.
 • यानंतर त्यात टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या.
 • मग त्यात बटाटे, गाजर, वाटाणे, फ्लॉवर, पनीर, बीन्स घालून थोडा वेळ शिजवा.
 • यानंतर त्यात पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, मीठ आणि गरम मसाला घालून थोडे परतून घ्या.
 • शेवटी भिजवलेले तांदूळ, लिंबाचा रस आणि पाणी घाला.
 • दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा.
 • तुमचा व्हेज पुलाव तयार आहे.
 • तुम्ही हा पुलाव लोणचं किंवा कौशिंबीर पापड सोबत खाऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी