Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Wishes : छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून करा लोकराजाला विनम्र अभिवादन!

आज छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला विनम्र अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील.

rajarshi shahu maharaj punyatithi 2022 hd images wallpapers greetings and wishes to shared with family and friends
छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages 
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श लोक कल्याणकारी राजा समोर येतो.  
  • राजर्षि शाहू महाराज भारतीय समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते.  
  • या कल्याणकारी राजाचे  6 मे 1922 रोजी मुंबईत निधन झाले.

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images: छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श लोक कल्याणकारी राजा समोर येतो.  राजर्षि शाहू महाराज भारतीय समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते.  शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता.

बालपणी त्यांना यशवंत नावाने ओळखले जायचे, छत्रपती शाहू महाराज हे एक महान राजा होते. त्यांना दलित आणि शोषितांचे दु: ख माहिती होते. त्यामुळे त्यांनी या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केलेत. दलित वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यास सुरूवात केली. गरीब आणि गरजू  विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण केली.  शाहू महाराजांच्या कारकीर्दीत 'बालविवाह' वर बंदी घालण्यात आली होती. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. रयतेचा राजा, लोक राजा अशी त्यांना जनतेने उपाधी दिली होती. 

आज छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला विनम्र अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील.

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 massages

                                                   Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Wishes । Photo BCCL 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 massages 2

                                                   Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Wishes । Photo BCCL 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 massages 1

                                                   Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Wishes । Photo BCCL 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 massages 2

                                                   Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Wishes । Photo BCCL 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 massages 4


या कल्याणकारी राजाचे  6 मे 1922 रोजी मुंबईत निधन झाले. महाराजाने पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली होती. दलितांच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी दोन खास प्रथा संपवल्या. त्यामुळे ते युगपुरुष असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी 1917 मध्ये अस्पृश्यांना जमीन देऊन 'बलुतेदारी-प्रथा' संपविली. त्याचप्रमाणे 1918 मध्ये त्यांनी राज्यातील आणखी एक जुनी प्रथा ‘वतनदारी’ संपविण्याचा कायदा केला आणि जमीन सुधारणा धोरण राबवून महारांना जमीन मालक होण्याचा अधिकार दिला.

कोल्हापुरात पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधला तो शाहू महाराज यांच्या काळातच. मुंबईला चाकरमानी रोजगारासाठी जाऊ नये साठी त्यांनी कोल्हापुरात कापड मिल काढली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी