Rajmata Jijabai Jayanti 2022 Wishes: राजमाता जिजाबाई जयंती निमित्त Messages, WhatsApp Status ठेऊन द्या जिजाऊंना मानाचा मुजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतु, हे स्वराज्य स्थापण करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतूनच रयतेचे राज्य उदयाला आले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीपुढे रयत खंबीरपणे उभा राहू शकली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णाण केली. या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रुपात जिजाबाईंनी केली होती.

rajmata jijabai jayanti 2022 images messages wishes in marathi for whatsapp status facebook twitter and instagram
जिजाऊंना जयंती निमित्त मानाचा मुजरा  
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मातोश्री जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज (12 जानेवारी 2022) जयंती (Rajmata Jijabai Jayanti 2022) .
  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती.
  • या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रुपात जिजाबाईंनी (Rajmata Jijabai Jayanti 2022 HD Images) केली होती.

Rajmata Jijabai Jayanti 2022 Wishes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मातोश्री जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज (12 जानेवारी 2022) जयंती (Rajmata Jijabai Jayanti 2022) . छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू, हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतूनच रयतेचे राज्य उदयाला आले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीपुढे रयत खंबीरपणे उभा राहू शकली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णाण केली. या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रुपात जिजाबाईंनी (Rajmata Jijabai Jayanti 2022 HD Images) केली होती. अशा जिजाबाईंच्या जयंतीनिमित्त आपण HD Images, WhatsApp Status च्या रुपात शुभेच्छा, देऊन जिजाऊं बद्दलच्या स्मृतींना उजाळा देऊ शकता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे त्यांच्या आईवडीलांनी ठेवलेले नाव जिजाबाई होते. परंतू, पुढे त्यांचे कर्तृत्व बहरले. त्यांच्या पोटी शिवाजी नावाचे रत्न जन्माला आले. पुढे त्यांना जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब अशा विविध नावांनी संबोधले जाऊ लागले. उपलब्ध इतिहासांच्या दाखल्यांनुसार जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाबाई यांचा जन्म झाला. लखूजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंसज आहेत. याच जिजाबाईंचा विवाह डिसेंबर 1605 दौलताबाद येथे शहाजीराजे यांच्याशी झाला.

Rajmata jijau jayanti  2022 wishes in marathi 1

                                                                                 Rajmata Jijabai Jayanti । Photo : BCCL 

जिजाऊ...

ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती

याच माऊली  ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती

राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा 

Rajmata jijau jayanti  2022 wishes in marathi 2

                                                                                 Rajmata Jijabai Jayanti । Photo : BCCL 

राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा 

Rajmata jijau jayanti  2022 wishes in marathi 2

                                                                                 Rajmata Jijabai Jayanti । Photo : BCCL 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

छत्रपती शिवाजी  महाराजांना

घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या

जयंती निमित्त मानाचा मुजरा!

Rajmata jijau jayanti  2022 wishes in marathi 3

                                                                                 Rajmata Jijabai Jayanti । Photo : BCCL 

धन्य ती माता जिजाबाई 
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज 
धन्य धन्य ते स्वराज... 

राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा 
 

Rajmata jijau jayanti  2022 wishes in marathi 4


शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या विवाहामुळे जाधव आणि भोसले हे एकमेकांचे व्याही झाले. परंतू, काळ मोठा विचित्र. काळाच्या ओघात जाधव भोसले घराण्यांमध्ये वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की या घराण्यांनी एकमेकांच्या घराण्यांतील कर्ते पुरुष ठार केले. त्याची झळ दोन्ही बाजूला बसली. दोन्ही घराण्यांचे संबंध बिघडले.

सासर माहेर यांच्यात आलेल्या कटुतेच्या अशा कठीण काळात कोणत्याही स्त्री समोर माहेर की सासर हा प्रश्न उभा राहणार. जिजाबाई यांच्याही समोर तो उभा राहिला. परंतु, जिजाबाई यांनी आपल्या पतिसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माहेरचे नाव टाकले. सर्व संबंध तोडले. भावना, नाती यांना बाजूला सारले आणि पतिची बाजू भक्कम करण्याचे व्रत घेतले. त्यांनी आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसर न सोडता छोट्या शिवबाचा शिवाजीराजा घडवला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी