Rajmata Jijabai Jayanti (Date Wise) 2023 Wishes: राजमाता जिजाबाई जयंती ( तारखेनुसार )निमित्त खास मराठी Messages, HD Images, WhatsApp Status शेअर करून करा मानाचा मुजरा

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes: राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी संदेशपत्र आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता.

rajmata jijabai jayanti 2023 Date Wise messages wishes in marathi for whatsapp status facebook twitter and instagram
राजमाता जिजाबाई जयंती (तारखेनुसार) निमित्त खास मराठी Message 

Rajmata Jijabai Jayanti 2023 Messages in Marathi : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज,12 जानेवारी रोजी (तारखेनुसार)  मरणोत्तर 417 वी जयंती आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) आणि म्हाळसाबाई (Mhalsabai) यांच्या पोटी पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला होता. लहानपणापासून कणखर पण तितकाच कनवाळू वृत्तीचा संगम त्यांच्या ठायी होता. हाच स्वभाव पुढे जाऊन त्यांना शहाजी राजें (Shahahi Raje) सोबत संसार करताना, शिवाजी महाराजांना (Chatrapati Shivaji Maharaj)  घडवताना, आणि रयतेला धीर देत राज्यकारभार करताना फायदेशीर ठरला. .आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहणारे हे काही संदेश आम्ही आपल्याला देत आहोत. आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता. (rajmata jijabai jayanti 2023 messages wishes in marathi for whatsapp status facebook twitter and instagram)


राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी संदेशपत्र

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes messages

जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes messages 1
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी  महाराजांना
घडवणार्‍या राजमाता
जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes messages 2

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes messages 4

हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य,
चारित्र्य, संघटन व पराक्रम
अशा राजस आणि सत्त्व
गुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांना
जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes messages 3

राजमाता जिजाबाई
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी