Rajmata Jijabai Jayanti Special : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज, 6 जानेवारी रोजी (तिथीनुसार) मरणोत्तर 417 वी जयंती आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) आणि म्हाळसाबाई (Mhalsabai) यांच्या पोटी पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला होता.
पहिली चारोळी
मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला,
साक्षात् होती ती आई भवानी,
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी.
दुसरी चारोळी
इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा,
झुकवूनी मस्तक करशील,जिजाऊंना मानाचा मुजरा.
तिसरी चारोळी
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा,
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.
चौथी चारोळी
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नि शंभू छावा,
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा.
पाचवी चारोळी
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे,
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे.
सहावी चारोळी
जिजाऊ एक स्त्री होती,
शहाजी राजांची वीर पत्नी होती,
जाधव घराण्याची लाडकी लेक होती,
स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती.
सातवी चारोळी
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी,
जिजाऊ महान माता होती,
जगातील प्रत्येक स्त्री ने आदर्श घ्यावा,
अशी आदर्श माता होती.
आठवी चारोळी
जिजाऊ आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात शिवबांनी घेतला,
जग पाहिल जरी नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.