Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes: राजमाता जिजाबाई जयंती ( तिथीनुसार) निमित्त खास मराठी Messages, HD Images, WhatsApp Status शेअर करून वाहा जिजाऊंना आदराजंली

Rajmata Jijabai Jayanti 2023 Wishes: राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी संदेशपत्र आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता.

rajmata jijabai jayanti marathi messages images whatsapp status to share via instagram facebook twitter and social media with friends and family
राजमाता जिजाबाई जयंती ( तिथीनुसार) निमित्त खास मराठी Message  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज, 6 जानेवारी रोजी (तिथीनुसार)  मरणोत्तर 417 वी जयंती आहे.
  • बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) आणि म्हाळसाबाई (Mhalsabai) यांच्या पोटी पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला होता.
  • लहानपणापासून कणखर पण तितकाच कनवाळू वृत्तीचा संगम त्यांच्या ठायी होता.

Rajmata Jijabai Jayanti 2023 Marathi Wishes: : स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज, 6 जानेवारी रोजी (तिथीनुसार)  मरणोत्तर 417 वी जयंती आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) आणि म्हाळसाबाई (Mhalsabai) यांच्या पोटी पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला होता. लहानपणापासून कणखर पण तितकाच कनवाळू वृत्तीचा संगम त्यांच्या ठायी होता. हाच स्वभाव पुढे जाऊन त्यांना शहाजी राजें (Shahahi Raje) सोबत संसार करताना, शिवाजी महाराजांना (Chatrapati Shivaji Maharaj)  घडवताना, आणि रयतेला धीर देत राज्यकारभार करताना फायदेशीर ठरला. .आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहणारे हे काही संदेश आम्ही आपल्याला देत आहोत. आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता.


राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी शुभेच्छा

Rajmata Jijau jayanti 2023 messages
मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला,
साक्षात् होती ती आई भवानी, 
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी.

Rajmata Jijau jayanti 2023 messages 2
इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा,
झुकवूनी मस्तक करशील,जिजाऊंना मानाचा मुजरा.

Rajmata Jijau jayanti 2023 messages 3
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, 
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने, 
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.

Rajmata Jijau jayanti 2023 messages 4
जिजाऊ तुम्ही नसता तर, 
नसते झाले शिवराय नि शंभू छावा, 
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा.

Rajmata Jijau jayanti 2023 messages
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे,
जिजाऊ तुम्ही नसता तर, 
नसते दिसले विजयाचे सोहळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी