12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती आहे. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.त्यांच्या जयंती निमित्त महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.
नमस्कार मित्रांनो ! 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती आहे. राजमाता जिजाऊ जयंती निमित्त त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्यासाठी विविध ठिकाणी आणि शाळांमध्ये जयंती साजरी केली जाते.
अधिक वाचा : उत्साहाचा संचार करतील स्वामी विवेकानंदांचे विचार
या जिजाऊ जयंतीच्या निमीत्ताने विद्यार्थ्यांना अत्यंत मोजक्या शद्बांत छोटेखानी भाषण किंवा निंबध लिहिता यावा यासाठी ही माहिती टाइम्स नाऊ मराठीकडून देण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांचे दहा ओळींचे मराठी भाषण आणि निबंध छोटा वाटत असला तरी या दहा वाक्यांमधून किंवा ओळींमधून त्यांच्या संपूर्ण जीवनातील घडामोडी आपल्याला यातून समजतील. चला तर मग आजच्या लेखातून छोटे खानी भाषण किंवा निबंध पाहू या.
राजमाता जिजाऊ यांच्या विषयी भाषणाची सुरूवात करण्यापूर्वी आपल्या स्टेजवर आणि स्टेजच्यासमोर असलेल्या व्यक्ती कोण आहेत याचा अंदाज घेऊन भाषणाच्या आकर्षक सुरुवात करावी.
अधिक वाचा : योगगुरू रामदेवबाबांचे डाएट
नमस्कार मित्रांनो! आज 12 जानेवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारी त्यांची माता राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस तथा तारखेनुसार जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांची जयंती प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे, माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना सर्वआधी राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मी माझे छोटेखानी भाषण आपणापुढे सादर करीत आहे हे भाषण आपण शांतपणे ऐकावे ही माझी विनंती करतो आणि भाषणाला सुरूवात करतो!
अधिक वाचा : तुमच्या राशीच्या व्यक्तीची बुद्धी किती तल्लख? वाचा
अधिक वाचा : अलिबागच्या आसपास फिरण्यासारखी प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणे
राजमाता यांना मानाचा मुजरा करून मी माझे भाषण संपवतो, जय शिवराय, जय जिजाऊ