Rajmata Jijau jayanti 2023 marathi Speech, Bhashan and nibhand : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भाषण मराठी 2023 

Rajmata Jijau jayanti 2023 marathi Speech : राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील  सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता.  त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती.

Rajmata Jijau jayanti 2023 marathi Speech marathi bhashan nibandh pdf
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भाषण मराठी 2023   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील  सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला.
  • तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता.  त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते.
  • लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती.

Rajmata Jijau Speech 2023 in Marathi :  राजमाता जिजाऊ भाषण आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक, सूत्रसंचालक तसेच, उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग यांना मी नमस्कार करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. खरंतर, राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणं हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे मला राजमाता जिजाऊ यांचाबद्दल बोलण्याची संधी मिळतेय. मित्रहो, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कुणाला काही माहीत नाही, असे कधीच होऊ शकत नाही.

अधिक वाचा : हिवाळ्यात दही खावे की नाही? वाचा...

ज्यांनी आपल्या  स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन सर्व  जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले. माँसाहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.

“मुजरा माझा माता जिजाऊंना,

जिने घडविले शुर शिवबाला.

साक्षात होती ती आई भवानी,

जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!”

अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हयातील  सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता.  त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती.

या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले. आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती. या मुघल सत्तेतील जे अमानुष लोक होते ते आपल्या आया-बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते.

कोण थांबवणार त्यांना ? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर त्यावेळची परिस्थिती होती. परंतु, यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करताना दहा वेळा विचार करायला हवा असे काही तरी केले पाहिजे.

अधिक वाचा : या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नये लसूण

हा विचार आपल्या उराशी आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. शिवबाच्या जन्मामुळे माँसाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र शिवबा, आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते.

शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे  स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच, अनेक पुराणांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झालेली आहे ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे, तेव्हा तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे.

हे वाक्य जर आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आपल्या  महाराष्ट्रातील मोठ-मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते जिजाऊ माँसाहेबांनी करून दाखविले. शिवबाच्या जन्माच्या अगोदरच माँसाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते. शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण घेतला.

येण केण प्रकारेण स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी राजांनी ठरविले. कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते. परंतु माँसाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही. स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे.

अधिक वाचा : Hair fall Remedy: या घरगुती उपयाने थांबवा केस गळती

शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे  स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच, अनेक पुराणांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झालेली आहे ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे, तेव्हा तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे.

हे वाक्य जर आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आपल्या  महाराष्ट्रातील मोठ-मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते जिजाऊ माँसाहेबांनी करून दाखविले. शिवबाच्या जन्माच्या अगोदरच माँसाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते. शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण केला होता.

अधिक वाचा  : जास्त लिप बाम लावू नका अन्यथा...

येण केण प्रकारेण स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी राजांनी ठरविले. कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते. परंतु माँसाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही. स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे.

“जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते राहिले शिवबा अन शंभू छावा.

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा!”

आपल्या मुलांवर सुसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत, त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजेत या सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल, तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंचे आचरण केले पाहिजेत.

हल्लीच्या मातांकडे आपण पाहिलं, तर एक भीषण दृष्य आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या काळात १०० टक्केंपैकी ९९ टक्के माता अशा आहेत, ज्या आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन स्वतःची जबाबदारी पुर्ण करतात. खरंतर, आपल्या मुलांचे शरीर सदृढ बनवण्यास आपल्याला गरज असते ती फिरण्याची आणि व्यायामाची.

परंतू, आजची आई स्वतःच्या मुलांना मोबाईल देऊन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते आहे. यांमुळे, आजची मुलं ही खूप हट्टी आणि आळशी बनत आहेत. मात्र, ही गोष्ट त्यांच्या मातेंच्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कुणीही यात कोणताही बदल घडवून आणू शकत नाही. अशा या महान जिजाऊ माँसाहेबांबद्दल आपण  कितीही बोलले तरी कमीच आहे.

अधिक वाचा :फळे खाण्याची योग्य पद्धत माहितीये का?

समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिले तरी तेदेखील कमी पडेल, अशी जिजाऊ माँसाहेबांची कीर्ती आहे. खरंतर, जिजाऊच्या लग्नाआधी त्यांना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांच्या राजनीतीत आणि युद्धकलेत प्रावीण्य मिळवले होते आणि याचाच उपयोग त्यांना पुढे त्यांच्या लग्नानंतर शिवबा जन्मल्यावर, शिवरायांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि अमूल्य असे संस्कार  देण्यासाठी झाला.

मित्रांनो, प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजींना जन्माला घातले. खरंतर, शिवबाच्या जन्माआधी जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते.

शेवटी एकटे शिवाजी महाराज जगले. खरंतर , या प्रसंगातून एखादी दुसरी माता जर गेली असती तर तिने आपल्या पुत्राला कधीच अशा जीवघेण्या कार्यासाठी सज्ज केले नसते.

उलट त्या मातेने आपल्या पुत्राचे खूप लाड केले असते, त्याचे सर्व हट्ट पुरवले असते. पण, माझ्या राजमाता जिजाऊने मात्र आपल्या प्राणप्रिय असलेल्या शिवबा पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले. त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे आणि जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा तुळजाभवानीला केलेल्या प्रार्थनेनुसार त्यांनी शिवबांना घडवायला सुरुवात देखील केली. 

अधिक वाचा : खोकल्याचा त्रास होत असल्यास करा हे घरगुती उपाय

जेव्हा पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे १४ वर्षांचे होते. तरीदेखील, लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तेव्हा पुण्याची अवस्था ही अतिशय भीषण होती. त्यामुळे, पुण्यात येताच राजमाता जिजाऊंनी आपला पदर कंबरेत खोवला आणि पुण्याचे काम हाती घेतले.

 शिवाजी राजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म यांसारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असतं. खरंतर, न्यायनिवाडा करण्याचे धडे हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेकडूनच प्राप्त झाले. अशा पद्धतीने, राजमाता जिजाबाई या  शिवाजी महाराजांच्या खरंतर आद्यगुरूच होत्या.

याशिवाय, शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच  त्यांचा निर्मळ उद्देश होता. शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यात कैद होते, तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे ही  जिजाऊ मातेंच्या हाती होती.

अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये आपला देह ठेवला. मित्रांनो, अशा जिजाऊंमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

अधिक वाचा :

राष्ट्र आणि धर्म यांसारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असतं. खरंतर, न्यायनिवाडा करण्याचे धडे हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेकडूनच प्राप्त झाले. अशा पद्धतीने, राजमाता जिजाबाई या  शिवाजी महाराजांच्या खरंतर आद्यगुरूच होत्या.

याशिवाय, शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच  त्यांचा निर्मळ उद्देश होता. शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यात कैद होते, तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे ही  जिजाऊ मातेंच्या हाती होती.

अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये आपला देह ठेवला. मित्रांनो, अशा जिजाऊंमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

राष्ट्र आणि धर्म यांसारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असतं. खरंतर, न्यायनिवाडा करण्याचे धडे हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेकडूनच प्राप्त झाले. अशा पद्धतीने, राजमाता जिजाबाई या  शिवाजी महाराजांच्या खरंतर आद्यगुरूच होत्या.

याशिवाय, शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच  त्यांचा निर्मळ उद्देश होता. शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यात कैद होते, तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे ही  जिजाऊ मातेंच्या हाती होती.

अधिक वाचा :मुळा खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे

अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये आपला देह ठेवला. मित्रांनो, अशा जिजाऊंमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

आपले शिवाजी महाराज जेव्हा सुभेदार म्हणून पुणे परगण्यात आले तेव्हा जिजाऊ राजमाता शिवबांना तिथला कारभार चालवण्यासाठी एक ठराविक रक्कम देत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, पॉकेटमनी देत. पण ते पैसे परगण्याचा खर्च चालवण्यासाठीच दिले जायचे. तेवढ्याच रक्कमेत शिवाजी महाराज सगळं नियोजित करायचे.

म्हणजे, अगदी प्रजेला दुष्काळाच्या काळात द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईपासून ठरलेले खर्च सगळंच काही. बरं हे सर्व नियोजन शिवाजी महाराज कितव्या वर्षी करत होते असेल, तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी! तीन वर्षांपर्यंत हा अशाप्रकारे सर्व डोलारा संभाळत शिवबांनी कारभार चालवला मग पंधराव्या वर्षी जेव्हा त्यांनी रायरेश्वरासमोर शपथ घेतली.

तेव्हा कुठे त्यांची या ‘पॉकेटमनी’ प्रकारातून सुटका झाली. राजमाता जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवाजी महाराज सर्व गोष्टी करत असत. राजमाता जिजाऊंचा एकही शब्द शिवबांनी कधीही खाली पडू नाही दिला.

आपले शिवाजी महाराज जेव्हा सुभेदार म्हणून पुणे परगण्यात आले तेव्हा जिजाऊ राजमाता शिवबांना तिथला कारभार चालवण्यासाठी एक ठराविक रक्कम देत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, पॉकेटमनी देत. पण ते पैसे परगण्याचा खर्च चालवण्यासाठीच दिले जायचे. तेवढ्याच रक्कमेत शिवाजी महाराज सगळं नियोजित करायचे.

म्हणजे, अगदी प्रजेला दुष्काळाच्या काळात द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईपासून ठरलेले खर्च सगळंच काही. बरं हे सर्व नियोजन शिवाजी महाराज कितव्या वर्षी करत होते असेल, तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी! तीन वर्षांपर्यंत हा अशाप्रकारे सर्व डोलारा संभाळत शिवबांनी कारभार चालवला मग पंधराव्या वर्षी जेव्हा त्यांनी रायरेश्वरासमोर शपथ घेतली.

तेव्हा कुठे त्यांची या ‘पॉकेटमनी’ प्रकारातून सुटका झाली. राजमाता जिजाऊंच्या आज्ञेनुसार शिवाजी महाराज सर्व गोष्टी करत असत. राजमाता जिजाऊंचा एकही शब्द शिवबांनी कधीही खाली पडू नाही दिला.

अधिक वाचा : बर्फ वापरा वजन घटवा

पण मित्रांनो, जिजाऊ माँसाहेब समजून घेणं हे कोणत्याही येड्यागबाळ्याचं काम नाही हे खरं! राजमाता जिजाऊ समजावून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला त्यांच्या जागी उभ करावं लागेल, तरच आपल्याला राजमाता जिजाऊ कळतील.

जिच्‍या हाती पाळण्‍याची दोरी ती जगाला उध्‍दारी, अशा उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे आपल्या  मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि ‘निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई होती, तर ती एका ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब  जिजाऊंची!

राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यातील शिवनेरीच्या अंगाखांदयावर शिवरायांना लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला शिकविताना त्यांनी शिवरायांना महाभारत आणि रामायणातील ‘राम आणि कृष्णांच्या’ गोष्टींचे बोधामृत पाजले. याशिवाय, त्यांनी शिवरायांना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू देखील पाजले. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे’ असा मूलमंत्र ज्यांनी शिवरायांच्या मनात उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ.

महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे, तशीच वीर मातांची देखील भूमी आहे. मित्रांनो, राजमाता जिजाऊ या काही साधारण स्त्री नव्हत्या. जिजाऊने आपल्या मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान पेरला होता. मावळलेल्या जनतेला स्वराज्याचे स्वप्न दाखवून, त्यांना खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनीच केले होते.

त्यांनी, शिवबांना लहानपणापासुनच स्त्रियांचा आदर करायला शिकवलं होत. त्यावेळी, मुघलांकडून आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांवर खूप अन्याय-अत्याचार व्हायचा, त्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी आणि स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून उभ राहण्यासाठी त्यांनी शिवबांना तयार केलं होत.

अधिक वाचा : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

मित्रांनो, ज्यावेळी शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यात अडकले होते. तेव्हा राजमाता जिजाऊ या स्वतः पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजींना मुक्त करण्यासाठी युद्धावर निघाल्या होत्या; पण नेताजी पालकर यांनी त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त केले. या प्रसंगात त्यांची पुत्रप्रेमाची आर्तता दिसून येते तसेच, विलक्षण आवेश गोष्टी देखील दिसून येतात.

इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते, हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले. जिजाबाईंच्या अंगी अनेक चांगले गुण होते.

अधिक वाचा : दररोज खा अंडे पुरुषांना मिळतील जबरदस्त फायदे

त्या खूप मोठ्या कर्तबगार होत्या. शहाजी राजेंनी सर्व राज्यकारभार हा राजमाता जिजाऊंच्या हाती स्वाधीन केला होता. राजमाता जिजाऊंवर एक काव्य असे लिहिले आहे जे आपल्या राजमातेबद्दल उल्लेखनीय वर्णन करते. ते म्हणजे, ‘युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती, सह्याद्रीच्या कुशीत, उदयास आले एक अनमोल रत्न!

उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!’ आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्णदिन दाखवणाऱ्या, महान स्वराज्य संप्रेरिका माँसाहेब राजमाता जिजाऊंना मी शतशः नमन करते आणि माझे दोन शब्द इथच संपवते. धन्यवाद!

जय जिजाऊ! जय शिवराय!

....................


जिजाऊ जयंती निबंध भाषण | Rajmata Jijau Jayanti Essay Speech in Marathi भाषण - 2नमस्कार मित्रांनो आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन व कविता थोडक्यात माहिती वाचणार आहोत त्याचा उपयोग करून आपण छान असा निबंध भाषण व सूत्रसंचालन करू शकता. तुम्हां सर्वांना राजमाता जिजाऊ याच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.

महाराष्ट्रात जेवढ इतिहास संशोधन, अभ्यास, लिखाण, इ. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वर झालेले तेव्हढ कदाचित कोणत्या हि महापुरुष यांवर झाले असावेत. हे होण्या मागे प्रमुख कारण आहे, महाराष्ट्रा मध्ये या दोन महान व्यक्तीमत्वांना  घरा- घरात आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. याच पार्श्वभूमी वर आज च्या या लेखात आपण "राजमाता जिजाऊ जयंती निबंध भाषण (Rajmata Jijau Jayanti Essay Speech in Marathi)" बघणार आहोत. तर आपण थेट आपल्या आजच्या मुख्य विषया कडे वळू यात -

अधिक वाचा : Rishabh Pant ला आवडणारे पदार्थ

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण प्रास्तविक
सर्व प्रथम सन्माननीय राजमाता जिजाऊ आऊ साहेब आणि वन्दनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा करतो / करते. 

राजमाता जिजाऊ जयंती (Rajmata Jijau Jayanti) च्या पवित्र मुहूर्ता वर या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र व मैत्रिणी आणि पालक या सर्वांना माझा नमस्कार.

जसे की आपण सर्वांना माहित आहे कि, आज येथे आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयोजित भाषण स्पर्धे साठी जमलो आहे. आणि मला चांगलेच ठाऊक आहे कि, या भाषण स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्या मुळे मी आपला जास्त वेळ न घेता थोडक्यात माझे विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते आपण सर्वांनी शांत पणे ऐकावे अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती!

जिजामाता, (राजमाता जिजाऊ - Rajmata Jijau) यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी भुईकोट राजवाड्या मधे, बुलढाणा (महाराष्ट्र) जिल्ह्यातील सिंदखेडराजा  किंवा सिंदखेड प्रांत  या स्थळी झाला होता, हे आपणा सर्वांना माहिती आहे.  तिथीनुसार त्यांचा जन्म पौष पौर्णिमेला झाला. यंदा 6 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा येत आहे. त्या दिवशी राजमाता जिजाऊ यांना 

अधिक वाचा : रोहित-कोहली-राहुलशिवाय तयार होणार नवीन टीम इंडिया

राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्य राज्य चे संस्थापक माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. आज सिंदखेडराजा हे ठिकाण केवळ ऐतिहासिकच नव्हे तर, प्रसिद्ध पर्यटन स्थळ सुद्धा बनले आहे. दर वर्षी सिंदखेडरा या स्थळी "राजमाता जिजाऊ यांची जयंती (Rajmata Jijau Jayanti in Marathi)" मोठ्या उत्साहात साजरी केली जातो. ही गर्वाचीच बाब म्हणा. 

राज माता जिजाऊ यांना प्रेमाने ‘जिऊ ’ म्हटले जायचे. लखोजी राजे जाधव म्हणजे राजमाता जिजाऊ यांचे वडील हे परंपरेने देवगिरीचे असलेले यादव (जाधव) होते. या मुळे, जिजाबाई ही देवगिरीची राज कन्या होत्या. पण त्या काळाच्या तत्कालीन परिस्थिती मध्ये लखोजी राजे यांनी आपल्या तीन मुलांसह सुलतानाच्या सैन्यात सरदार होण्याचे मान्य केले. ही गोष्ट जिजाबाईंना फार खटकली होती. 

अधिक वाचा : 2023 महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा

राजमाता जिजाऊ यांना वाटायचे कि, जे लोक आपल्या माणसांना छाडतात, आपल्या हिंदू दैवतांची विटंबना करतात, गोर- गरीबांची- कष्टाळू शेतकऱ्यांची आर्थिक आणि शारिरीक शोषण करतात, महिलां वर नको ते शारिरीक- मानिसक अत्याचार करतात अश्या लोकां सोबत आपण का म्हणून काम कराचे ?  

चिमुकल्या वयात राजमाता जिजाऊ यांना पडलेला हा प्रश्न त्यांच्या मध्ये असलेली क्रांती ज्योत दाखवून देणारी आहे. 

कदाचित इथून च राजमाता जिजाऊ यांच्या मनात असा विचार आला असावा कि, या गुलाम गिरीतून मुक्त करण्यासाठी असा एक राज्य असावं जेथे महिलांना सन्मान, कष्टाळू शेतकरी यांना मान आणि शोषण मुक्त समाज असावा. 

पुढे राजमाता जिजाऊ यांचे शहाजी राजे भोसले यांच्या सोबत त्या विवाह बंधन मध्ये अडकल्या. येथून त्यांच्या जीवना मध्ये एक टर्निंग पॉईंट आला. 

पुढे एका घटने मुळे लेखोजी राजे जाधव आणि भोसले कुळ यांच्या मध्ये वैचारिक मतभेद आणि आपसी रणजिश मुळे दोन्ही कुळा मध्ये तळा पडली. राजमाता जिजाऊ यांच्या साठी हि तळा जेवढी राजकीय होती त्या हून हि अधिक भावनिक होती. कारण या घटने मुळे त्यांचं माहेर घर त्यांच्या पासून दूर झाले होते. 

अधिक वाचा : ऋषभ पंत कधीपर्यंत बरा होईल?

नंतर काही वर्षांनी काही कार्नवास्तव शहाजीराजे भोसले यांना पकडण्यासाठी निजामाने लखोजी राजे जाधव यांना आपल्या सैन्या सह जुन्नर ला पाठवले होते. तेव्हा राजमाता जिजाबाई गरोदर असल्याने त्यांना घोड्यावर बसून पुणे कडे प्रवास करणे शक्य नव्हते. म्हणून शहाजीराजे यांनी जिजाऊ माता यांना विश्वासराव आणि वैद्यराज निरगुडकर (एक डॉक्टर) यांच्या देख रेखी खाली शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. या दरम्यान, लखोजी राजे जाधव जुन्नर ला पोहोचले आणि अनेक वर्षांनी त्यांची अनियोजित आपल्या मुली सोबत शिवनेरी किल्ल्या वर भेट झाली. 

तेव्हा जिजाबाई वडिलांना म्हणाल्या, ‘मराठे केवळ अहंकार आणि लोभासाठी एकमेकांशी भांडत आहेत. जर त्यांच्या शूर तलवारी एक झाल्या तर परकीय आक्रमकांचा काही क्षणातच पराभव होईल. आपल्या उदरनिर्वाहा साठी आक्रमकांच्या हाता खाली काम करणे हे मराठ्यान साठी अपमानास्पद आहे, आपण ते सोडले पाहिजे '. 

राजमाता जिजाबाईंची प्रखर देश भक्ती आणि धर्म प्रेम त्यांच्या वडिलांना स्पर्शून गेले. जिजाऊंच्या मनस्वी विचाराने लखोजीराजे यांना आत्म परीक्षण करण्यास भाग पाडले. या मुळे जाधव आणि भोसले यांच्यातील वैर कायमचे संपुष्टात आले.

या एका घटनेने राजमाता जिजाऊ यांच्या मधील ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा भरून देण्याचे काम केले. आणि या एका घटने मुळे राजमाता जिजाऊ यांना कळून चुकले होते कि, स्वराज्य निर्मिती होणे हि संकल्पना अशक्य नाही. परिणामी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बाल वया पासूनच स्वराज्य निर्मितीचे बाल कढू देण्यास सुरुवात केली. 

अधिक वाचा : या आहेत जगातील सुंदर महिला क्रिकेटर

जिजाऊ मातेने, शिवाजी राजे यांना उत्तम नैतिकते चे, शास्त्र आणि शस्र यांची शिकवण दिली. त्यांना बुद्धी ने चतुर आणि शस्रात विपुल बनवले आणि लहान पणा पासूनच त्यांच्या मध्ये स्वतंत्र स्वराज्य निर्मिती ची इच्छा जागृत केली. 

राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणे ने शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापने ची शपथ घेतली आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी एका छोट्या सैन्याचा ते नेता बनले. आणि पुढे कश्या प्रकारे शिवाजी राजे भोसले यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती ची संकल्पना ते सिद्धी गाठली,  हे आपणा सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. 

स्वराज्य निर्मिती साठी राजमाता यांनी फक्त शिवाजी राजे भोसले यांनाच प्रेरित नवते केले तर या सोबत 

त्यांनी आपले वडील लखोजी राजे जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे भोसले यांना मुघलांची सेवा सोडून स्वतंत्र "स्वराज्य" राज्य स्थापन करण्यास प्रेरित केले. कारण राजमाता जिजाऊ यांचे ध्येय फक्त महाराष्ट्रा तून परकीय आक्रमकांना पळवून लावने नव्हते तर, सर्व मराठी सरदारांना संगठीत करून मराठा साम्राज्य उभे करायचे हे हि होते. 

अधिक वाचा : ऋषभ पंत चालवत होता ही मर्सिडीज, 5.7 सेकंदात पकडते 100 चा वेग

जिजामाता जिजाऊ यांना आपल्या अधिकार क्षेत्रातील प्रांताला कल्याणकारी राज्य बनवण्याची खूप इच्छा होती. म्हणून राजमाता जिजाऊ या, आपल्या हद्दीतील प्रांतात घडणाऱ्या प्रत्येक आर्थिक- सामाजिक- राजकीय- न्यायिक घडामोडीं मध्ये स्वतः हून सक्रिय रस घेत असे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यां वर आपले मत मांडत असे. 

आणि ते म्हणतात ना, 

"मंजिल सिर्फ उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, 

सिर्फ पंख होणे से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है !"

असाच हौसला (आशा) हा राजमाता जिजाऊ यांच्या अंगी होता. म्हणूनच त्यांच्या स्वतंत्र "स्वराज्य " राज्या ची महत्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केली. आणि राजमाता जिजाऊ यांच्या अधिपत्या खाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक छोटे - मोठे किल्ले जिंकून "मराठा साम्राज्य " याची स्थापना केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊन अवघ्या 12 दिवसांनी राजमाता जिजाबाई यांनी 1674 च्या रोजी अखेरचा श्वास घेतला. 

राजमाता जिजाबाईंच्या रूपाने 'आदर्श महिला कशी असावी ?' याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे. 

अधिक वाचा : फक्त सुर्या आणि सुर्याच! T20 क्रिकेटर ऑफ द इयर

राजमाता जिजाऊ मधील तीव्र तळमळ, श्रद्धा, दृढ निश्चय, संयम, धर्मा प्रती आदराची भावना, नि: स्वार्थी पणा, चाणाक्ष बुद्धी, योद्धा वृत्ती, व्यापक विचार सरणी, निर्भयता, नेतृत्व, धैर्य, युद्ध नीती, चातुर्य, त्याग करण्याची वृत्ती तसेच, इच्छा शक्ती असे बहुआयामी गुण होते. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती (Rajmata Jijau Jayanti) निमित्त समाजातील सर्व महिला मध्ये या क्षमता विकसित व्हाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आपण सर्वांनी शांत चित्त पणे बसून माझे भाषणातील विचार ऐकले म्हणून मी आपल्या सर्वांचा/ ची ऋणी आहे. एवढे बोलुनी मी आपल्या सर्वांची रजा घेते.

जय जिजाऊ, जय शिवराय. 

भारत माता कि जय . 


FAQ

Q. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला राजमाता ? 

ANS. जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला, तिथी नुसार पौष पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला होता. 

Q. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ?

ANS. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला

Q. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते ?

ANS. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरिजाबाई  होते

Q. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

ANS. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते

आम्ही दिलेल्या rajmata jijau speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी