Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages: राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त जिजाऊंना मानाचा मुजरा करणारे मेसेज

महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपूत्र संभाजी महाराज यांच्या जडणघडणीत सिंहांचा वाटा असणार्‍या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा तारखेनुसार 17 जून हा पुण्यतिथीचा दिवस आहे.

rajmata jijau punyatithi 2022 marathi messages quotes whatsapp status hd images to remember the chhatrapati shivaji maharaj mother jijabai bhosale on her death anniversary
जिजाऊंना मानाचा मुजरा करणारे मराठी मेसेज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि त्यांचे सुपूत्र संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या जडणघडणीत सिंहांचा वाटा असणार्‍या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा तारखेनुसार 17 जून हा पुण्यतिथीचा दिवस आहे.  
  • गेल्या दोन वर्षांपासून  जिजाऊंना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी बाहेर पडता आले नाही. 
  •  सोशल मीडियामध्ये मराठीमोळे आणि प्रेरणादायी संदेश पाठवून जिजाऊंचा निर्भिडपणा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहचवू शकता.

Rajmata Jijabai Punyatithi Marathi Message 2022 : महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि त्यांचे सुपूत्र संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या जडणघडणीत सिंहांचा वाटा असणार्‍या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा तारखेनुसार 17 जून हा पुण्यतिथीचा दिवस आहे. गगेल्या दोन वर्षांपासून  जिजाऊंना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी बाहेर पडता आले नाही.  पण यंदा राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तरीही आपल्या स्वराज्याची मूर्तमेढ रचणाऱ्या जिजाऊंचे  पुण्यस्मरण करण्यासाठी सोशल मीडियामध्ये मराठीमोळी आणि प्रेरणादायी संदेश पाठवून त्यांचा निर्भिडपणा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहचवू शकता. आज जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या दिनी स्मरण करून त्यांच्या शौर्याची आणि आदर्शाची  गाथा पुढच्या पिढी समजवून सांगणे आवश्यक आहे. फेसबूक (Facebook), व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), टेलीग्राम (telegram), शेअरचॅट (Sharechat) मेसेज, स्टेटसच्या माध्यममातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे हे खास मराठमोळे मेसेज, इमेजेस (Images), संदेश  नक्की शेअर करा. 

महाराष्ट्रात सिंदखेड राजाचे लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या घरी जिजाऊंचा जन्म झाला. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह संपन्न झाला. शहाजीराजेंच्या पश्चात त्यांनी शिवरायांना घडवण्यात, प्रसंगी हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवरायांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांवर आई प्रमाणे प्रेम केले आणि त्यांनाही महाराजांच्याप्रमाणे घडवले. 

Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages

                                                                                Rajmata Jijabai Punyatithi 2022 । File Photo

Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages 1

                                                                                Rajmata Jijabai Punyatithi 2022 । File Photo
 

Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages 3                                                                                Rajmata Jijabai Punyatithi 2022 । File Photo

Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages 2

                                                                                Rajmata Jijabai Punyatithi 2022 । File Photo

Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages 4

                                                                              Rajmata Jijabai Punyatithi 2022 । File Photo

जिजाबाई केवळ या केवळ आदर्श आई नव्हे तर उत्तम शासक आणि पत्नी होत्या. तसेच त्या प्रेरणादायी आजीही होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेक स्त्रियांसाठी आदर्श आहे. जिजाऊ या त्या काळातही घराची आणि रयतेच्या राज्याची जबाबदारी तितक्याच धैर्याने आणि संयमाने सांभाळत होत्या.   घर संसार आणि करियर यांच्यामध्ये कसरत करणार्‍या प्रत्येक महिलेसाठी आजही त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी