रक्षाबंधनासाठी हातावर काढा मेहंदी, लेटेस्ट मेहंदीच्या डिझाईनसाठी क्लिक करा

येत्या गुरूवारी म्हणजेच १५ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनासाठी जर का तुम्ही मेहंदी काढण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास लेटेस्ट मेहंदी डिझाईनच्या आयडिया देत आहोत.येथे बघा ट्रेंडी डिझाईन्स...

 Mehndi Design for Raksha Bandhan
रक्षाबंधनासाठी हातावर काढा मेहंदी, लेटेस्ट मेहंदीच्या डिझाईनसाठी क्लिक करा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • रक्षाबंधनानिमित्त बहिणींसाठी खास मेहंदी डिझाईन्स
  • येत्या १५ ऑगस्टला आहे रक्षाबंधन
  • मेहंदी काढणाऱ्या बहिणींसाठी खास लेटेस्ट डिझाईन्स

बहिण भावाचं नातं दर्शवणारा म्हणजेच रक्षाबंधन यावर्षी १५ ऑगस्टला आहे. येत्या गुरूवारी हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधन हे संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा होतो. तसंच उत्तर भारतात हा दिवस मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना करते. बहिणींमध्ये या सणाची मोठी क्रेझ असते. तसंच मुली या रक्षाबंधनासाठी मोठी तयारी देखील करतात. या तयारीत त्या कशाचीही कमतरता सोडत नाही. 

यात नवीन कपडे असो वा ज्वेलरी, त्यात ब्युटी पार्लर तर येतं. त्यातच मेहंदीची क्रेझ देखील काही मुलांना असते. यावेळी सर्व मुली नवीन कपडे खरेदी करतात. तसंच हातावर मेहंदी ही काढून घेतात. रक्षाबंधनाच्या दिवशी हातावर मेहंदी काढणं हे खूप शुभ मानलं जातं. या दिवसात बाजारात देखील राशीसाठी मेहंदी डिझाईनची स्पेशल डिमांड बघायला मिळते. मेहंदी विक्रेत्यांच्या मते, मुली रक्षाबंधनाच्या एक दिवसाआधी आपल्या हातावर अरबी डिझाईन्सटी मेहंदी काढण्यावर पसंती देतात. 
तसं, तुम्हाला हवं असल्यास स्वतःहूनच घरी आपल्या हातानंच सोप्या पद्धतीनं बनणारी मेहंदीची डिझाईन काढू शकता. येथे आहे खास पॅटर्न असलेल्या मेहंदीच्या डिझाईन्स.

 

रक्षाबंधनाचा दिवस हा बहिणींसाठी खूप खास असतो. या निमित्तानं, आपण आधीच मेहंदी डिझाइन अंतिम केले असल्यास, ते तयार करण्यात आपल्याला कोणतीही अडचण उद्भवणार नाही. आजकाल राजस्थानी, अरबी, पाकिस्तानी, फ्लोरल, बेल, मोरक्कन मेहंदी डिझाईन्स, बॅकहँड मेहंदी डिझाईन्स, मिनिमलिस्ट मेहंदी डिझाईन्स इत्यादी ट्रेंडमध्ये जास्त आहेत. आपल्या हातांसोबतच हे पॅटर्नची मेहंदी पायावरही रिक्रिएट करून लावू शकता. सध्या बाजारातही मेहंदीचे कोन सहज उपलब्ध होतात. तसंच बाजारातही मेहंदी काढून मिळते. पण काही मुलांना स्वतःहून आपल्या हातावर मेहंदी काढण्याची सवय असते. एकत्र बसून सर्व मुली मेहंदी काढतात. सध्या सोशल मीडियावर मेहंदीच्या डिझाईन्स सहज उपलब्ध होतात. 

जर तुम्हाला मेहंदीचा रंग मिळवायचा असेल तर जाणून घ्या या टीप्स 

मेहंदीमध्ये लाल रंगाची मेहंदी पाणी आहे तर लोह्याच्या एका भांड्यात मेहंदी रात्रभर भिजत ठेवा. त्यासोबतच त्यात एक लिंबाचा रस टाका आणि एक चमचा मोहरीचं तेल टाका. त्यानंतर यात एक चमचा साखरेचे पाणी घोळून त्यात टाका. रात्रभर ही मेहंदी भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातांवर आपल्याला आवडेल त्या डिझाइन काढा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी