Ram Navami 2021 wishes : रामनवमी निमित्त मराठी शुभेच्छा 

Ram Navami 2021 wishes : चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. यंदा २१ एप्रिल रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ram navami 2021 messages wishes images greetings stickers to share with your loved ones and family to celebrate lord ram birthday
Ram Navami 2021 wishes : राम नवमी निमित्त मराठी शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

 • चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस.
 • या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता
 • यंदा २१ एप्रिल रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Happy Ram Navami Wishes in Marathi : चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा २१ एप्रिल रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.  ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. 

रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण सर्वसाधारणपणे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला हळद कुंकू वाहिले जाते. त्यानंतर फुले वाहिली जातात. श्री रामाला केवडा, चंपा, चमेली आणि जुईची फुले वाहिली जातात. त्यानंतर त्याची आरती केली जाते. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो. 

या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते.  महाराष्ट्रातील अनेक राममंदिरात मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र गेल्या वर्षी आणि यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसंच यंदा मंदिरात जावून भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार नाही. पण नाराज होऊ नका. रामनवमी निमित्त विविध संदेश,  Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करुन रामनवमीचा उत्साह कायम ठेवू शकता.


श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Ram Navami Wishes In Marathi)

 1. राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 2. दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!
 3. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 4. एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 5. दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा! 
 6. प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!
 7. संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 8. श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 9. एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 10. चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला
 11. चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!
 12. गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम 
 13. राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!
 14. श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
 15. ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 16. रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 17. मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..  राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 18. राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!
 19. रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
 20. पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp Stickers च्या माध्यमातून कशा द्याल रामनवमीच्या शुभेच्छा:


सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. राम नवमीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Ram whatsapp stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी