Ram Navami Status In Marathi : राम नवमीसाठी खास व्हॉटसअप स्टेटस 

Ram Navami 2021 Whatsapp Status In Marathi । रामनवमी निमित्त विविध संदेश,  Wishes, Greetings, Whatsapp Status, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करुन रामनवमीचा उत्साह कायम ठेवू शकता.

ram navami 2021 whatsapp status Whatsapp Stickers
राम नवमीसाठी खास व्हॉटसअप स्टेटस   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • चैत्र नवरात्रीत नवव्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते.
 • यावेळी राम नवमी 21 एप्रिल रोजी आहे
 • भगवान राम यांचा जन्म राम नवमीला झाला.

Ram Navami 2021 Whatsapp Status In Marathi ।  मुंबई : राम नवमी ही चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी श्रीरामचा वाढदिवस म्हणजेच रामनवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्री रामाची पूजा अर्चना विधी विधानातून केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत राजा दशरथ यांच्या घरात झाला. 21 एप्रिल 2021 रोजी रामनवमी साजरी केली जाईल.

पौराणिक मान्यतानुसार भगवान श्रीराम यांनी पृथ्वीवरील अत्याचार संपवण्यासाठी अवतार घेतला. भगवान श्री राम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. भगवान श्रीराम यांना विष्णूचा अवतार म्हणतात. अयोध्याच्या महाराजा दशरथांच्या घरी माता कौशल्यांनी त्रेतायुगात भगवान श्रीरामाला जन्म दिला. 

तुलसीदास यांनी राम चरित मानसातील भगवान राम यांच्या चारित्र्याचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीराम यांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला. तुलसीदास यांनी राम नवमीच्या दिवसापासून रामचरितमानस निर्मितीस सुरवात केली.

असे मानले जाते की रामनवमीच्या दिवशी भगवान रामची उपासना केल्याने जीवनातील सर्व अडथळे आमि अडचणी दूर होतात आणि सुख शांती घरात नांदते. भगवान श्रीरामाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम ठेवायचे असतील तर राम नवमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्री रामाची पूजा करावी.  

महाराष्ट्रातील अनेक राममंदिरात मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र गेल्या वर्षी आणि यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसंच यंदा मंदिरात जावून भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार नाही. पण नाराज होऊ नका. रामनवमी निमित्त विविध संदेश,  Wishes, Greetings, Whatsapp Status, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करुन रामनवमीचा उत्साह कायम ठेवू शकता.


श्रीराम नवमीसाठी खास व्हॉटसअप स्टेटस (Ram Navami Status In Marathi)

 1. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.
 2. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!
 3. आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 4. रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!
 5. माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज आणि भरताचे त्याग आपल्या सगळ्यांना आयुष्यात शिकवण देत राहो.
 6. आज प्रभू राम असते तर त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ लोकांना शिकवला असता.
 7. वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
 8. प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही. प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या या देवतेच्या विचारांचा अवलंब केला तरी पुरे... श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
 9. बळे आगळा कोदंडधारी।  महाकाळा विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकारा कोण ठेवा । प्रभाते मनी राम चिंतित जावा । राम नवमीच्या शुभेच्छा
 10. रामाप्रती भक्ती तुझी  । राम राखे अंतरी  । रामासाठी भक्ती तुझी  । राम बोले वैखरी । उच्चारिता राम होय पाप चर  । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।
 11. रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ श्रीनारायण जगदुत्पादक त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला
 12. जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो. राम नवमीच्या शुभेच्छा
 13. प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
 14. राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे अस्त्तित्व म्हणजे  भारताचे नवनिर्माण आहे...राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 15. प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 16. ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.
 17. ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची वाणी सत्य आहे. त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 18. मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म दिनी राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 19. शुभ दिवस आहे राम जन्माचा चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

WhatsApp Stickers च्या माध्यमातून कशा द्याल रामनवमीच्या शुभेच्छा:

सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. राम नवमीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Ram whatsapp stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी