Ramadan Id Speical Sheer Khurma Recipe In Marathi, How To Make Sheer Khurma : रमजान या पवित्र महिन्याचा समारोप रमजान ईद (ईद उल-फ़ित्र / ईद उल-फितर) साजरी करून केला जातो. रमजान ईद निमित्त आनंद साजरा करण्यासाठी रुचकर शीर खुरमा तयार केला जातो. शीर खुरमा हा एक गोड पदार्थ आहे. एकमेकांना 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या जातात नंतर सहकुटुंब शीर खुरमा खात आनंद साजरा करण्याची पद्धत आहे.
दूध, खजूर, शेवया, तूप यांच्या मिश्रणातून दाटसर असा गोड पदार्थ तयार केला जातो. या पदार्थाला शीर खुरमा असे म्हणतात. ही एक क्लासिक मुघल मिठाई आहे. रमजानच्या महिन्यात रात्री उपवास सोडताना तसेच रमजान ईद हा सण साजरा करण्यासाठी शीर खुरमा तयार केला जातो. प्रामुख्याने रमजान ईद हा सण साजरा करण्यासाठी शीर खुरमा तयार करण्याची पद्धत आहे.
500 मिली दूध
50 ग्रॅम शेवया
पाव कप साखर
2 मोठे चमचे खजुराचे काप
पाव कप किसमिस (मनुका)
थोडी चारोळी
पाव कप बदामाचे काप
पाव कप काजू
पाव कप पिस्ता
पाव कप तूप
छोटा अर्धा चमचा केशर
छोटा अर्धा चमचा वेलची पूड
एका भांड्यात 2 कप पाणी उकळवून घ्या. आता दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये हे उकळवलेले पाणी अर्धे अर्धे असे विभागून भरा. यानंतर एका भांड्यातील पाण्यात सुकामेवा तर दुसऱ्या भांड्यातील पाण्यात अर्ध्या तासाकरिता चारोळ्या भिजवून ठेवा. अर्ध्या तासानंतर भांड्यांतील पाणी काढून घ्या. नंतर सर्व सुकामेवा सोलून घ्या. सुक्यामेव्याची सालं काढून घ्या. यानंतर सोललेला सुकामेवा पुन्हा दोन तास पाण्यात भिजवा. ही सर्व प्राथमिक तयारी झाल्यानंतर एक पॅन घ्या.
पॅनमध्ये तूप घालून तापवा. तापलेल्या तव्यावर तुपात घोळवून सर्व सुकामेवा भाजून घ्या. आता दुसऱ्या पॅनमध्ये तूप घालून त्यात शेवया भाजून घ्या. आता एका भांड्यात दूध घालून ते उकळवून दाटसर करून घ्या. दूध दाटसर झाल्यावर त्यात साखर घालून ढवळा आणि आणखी दाटसर व्हावे म्हणून थोडा वेळा उकळवा. दाटसर झालेल्या दुधात काजू, बदाम, चारोळ्या घालून व्यवस्थित ढवळा आणि आणखी उकळवा. नंतर दुधात वेलची पूड टाकून ढवळा. यानंतर दुधात शेवया टाकून ढवळा. दूध व्यवस्थित शिजल्याची खात्री झाल्यानंतर गॅस बंद करा. आपला गोड शीर खुरमा तयार आहे. सर्व्ह करताना शीर खुरमावर खजुराच्या कापाने सजवू शकता.
दुपारच्या जेवणानंतर झोप काढण्याचे फायदे
Shoe Bite : बूट लागला तर करायचे उपाय