अक्षय कुमारला रविनाने पकडले होते रंगेहाथ, अजय देवगणला लिहिले रक्ताने पत्र, हे आहेत रवीना टंडनचे वाद

रवीना टंडन १९९१ साली पथ्थर के फूल या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. रवीना टंडन ९० च्या दशकात सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती. रवीना अनेक वादमुळे चर्चेत राहिली आहे.

Ravina tondon had conflicts with Akshay kumar and Ajay Devgan
रवीना टंडन  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रवीना टंडनला चित्रपटसृष्टीत ३० वर्षांचा कार्यकाळ झाला आहे.
  • 1991 मध्ये रवीना टंडनने पत्थर के फूल या चित्रपटातून पदार्पण केले होते.
  • रवीना टंडन ही अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे.

मुंबई. रवीना टंडनला चित्रपट जगतात ३० वर्षे पूर्ण झाले आहेत.  १९९१ मध्ये रवीना टंडनने पत्थर के फूल या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यात त्यांनी सलमान खानसोबत काम केले  होते. रवीना टंडन ही सध्या जरी सिनेमांपासून दूर असली तरी त्या ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री राहिलेली आहे. 

रवीना टंडन आपल्या व्यक्तिगत आयुष्यामुळेही खूप चर्चेत होती. बातम्यांनुसार रवीना आणि अक्षय कुमारने मंदिरात जाऊन एंगजमेंटसुद्धा पार पाडली होती. रवीनाने नंतर एका मुलाखतीत म्हटले होते की अक्षय कुमार आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीला प्रपोज करतो.  

रवीना टंडनने जुलै १९९९ मध्ये स्टारडस्ट मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा अक्षयचे दुसरे अफेअर असायचे तेव्हा, माझे पत्रकार मित्र मला त्याबद्दल सावधान करायचे. मी अक्षयला रेखा आणि सुष्मिता सेनसोबत रंगेहाथ पकडले होते. 

अजय देवगनवरही लावले होते आरोप 

रवीना टंडन आणि अजय देवगन यांच्यातील जवळीकताही चर्चेचा विषय बनली होती. दोघांनी दिलवाले चित्रपटात सोबत काम केले होते. बातम्यांनुसार अजय देवगण त्यावेळी करिश्मा कपूरसोबतही डेटवर जायचा. 

अजय यांनी नंतर हे खोटे असल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. तो म्हणाले की रवीना त्याच्या नावाने स्वतःलाच पत्र लिहायची, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ती प्रकाशित करून दाखवावीत. 

करिश्मावरही लावले होते आरोप

रवीना टंडनने करिश्मा कपूरवरही आरोप लावले होते. रवीना टंडन एका मुलाखतीत करिश्मा कपूरचे नाव न घेता म्हणाली होती की, 'मी अभिनेत्रीचं नाव घेणार नाही. परंतु, तिला असुरक्षित वाटत आहे म्हणून त्यांनी मला चार सिनेमांतून काढून टाकले. मी तिच्यासोबत एक चित्रपटही केला आहे.'

२०१९ मध्ये पुन्हा रविना टंडन वादात अडकली होती. रवीना टंडन, भारती सिंह आणि फराह खानवर एफआयआर दाखल करण्यात आली होती. ख्रिश्चन संघटनेनुसार टीव्ही शो दरम्यान तिघांनी बायबलमधील एका शब्दावर आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. रवीनाने याबद्दल माफीसुद्धा मागीतली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी