Grace Birth Anniversary : आज मराठीतील महाकवी ग्रेस यांचा जन्मदिन, यानिमित्ताने वाचा त्यांच्या काही खास कविता

माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे मराठीतील महाकवी होते. ग्रेस यांचा जन्म नागपुरात १० मे १९३७ रोजी झाला होता. तर २६ मार्च २०१२ रोजी गळ्याचा कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते. वार्‍याने हलते रान या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना साहित्य आकादमीने त्यांचा गौरव केला होता.

grace
ग्रेस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे मराठीतील महाकवी होते.
  • ग्रेस यांचा जन्म नागपुरात १० मे १९३७ रोजी झाला होता.
  • आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त वाचा त्यांच्या काही खास कविता.

Marathi Poet Grace birth anniversary : माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे मराठीतील महाकवी होते. ग्रेस यांचा जन्म नागपुरात १० मे १९३७ रोजी झाला होता. तर २६ मार्च २०१२ रोजी गळ्याचा कर्करोगाने त्यांचे निधन झाले होते. वार्‍याने हलते रान या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना साहित्य आकादमीने त्यांचा गौरव केला होता. ग्रेस याचे पाच कविता संग्रह आणि सात ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले होते. इन्ग्रिड बर्गमनया या ब्रिटिश अभिनेत्रीमुळे त्यांनी ग्रेस या टोपणनावाने लेखन केले. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त वाचा त्यांच्या काही खास कविता.

पांढरे हत्ती

पांढऱ्या शुभ्र हत्तींचा

रानातून कळप निघाला

संपूर्ण गर्द शोकाच्या

झाडातहि मिसळून गेला.

त्या गूढ उतरत्या मशिदी

पक्ष्यांनी गजबजलेल्या

कल्लोळ पिसांचा उडता

आभाळ लपेटुन बुडल्या.

पांढऱ्या शुभ्र हत्तींनी

मग डोंगर उचलून धरले

अन तसे काळजाखाली

अस्थींचे झुंबर फुटले .

मावळता रंग पिसाट

भयभीत उधळली हरिणे

मुद्रेवर अटळ कुणाच्या

अश्रूत उतरली किरणे.

पांढरे शुभ्र हत्ती मग

अंधारबनातून गेले

ते जिथे थांबले होते

ते वृक्ष पांढरे झाले.

स्वप्नावर आली ओल

उन्हाची भूल

कोसळे रावां….

चिमटीत पिळावा जीव

तशी घे धाव

हवेतिल वणवा….

गावांचे चाहुलतंत्र

उन्हाळी मंत्र

भारतो जोगी…

कवटीत मालवी दीप

स्मृतींचे पाप

लावितो आगी..

हिरकणीस ठेचुन जाळ,

पेटवी माळ

पांगळा वैरी….

घाटात हरवली गाय

कापतो काय

कसाई लहरी….

जेथून मृगजळी धार

उन्मळे फार

दिठींची माया…

घारींनी धुतले पंख

भव्य नि:शंक

सूर्य सजवाया…..

शपथेवर सांगुन टाक

कोणती हाक

कोणत्या रानी,

झाडीत दडे देऊळ

येतसे गडे

जिथून मुल्तानी….

मुद्रेवर कोरुन डंक

खुपस तू शंख

हृदयदीप्तीने

गणगोत काढता माग

मला तू माग

तुझी जयरत्ने….

पक्ष्याविण रुसले झाड

नदीच्या पाड

पृथ्विचे रंग…

मिथिलाच उचलते जनक

पेटता कनक

भूमिचे बंध….

ग्रेस

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो

त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती

शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही

वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |

त्या व्याकुळ संध्यासमयी

त्या व्याकुळ संध्यासमयी

शब्दांचा जीव वितळतो,

डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे

मी अपुले हात उजळतो

तू आठवणींतुन माझ्या

कधी रंगीत वाट पसरशी,

अंधार-व्रताची समई

कधी असते माझ्यापाशी

पदराला बांधुन स्वप्‍ने

तू एकट संध्यासमयी,

तुकयाच्या हातांमधला

मी अभंग उचलुन घेई

तू मला कुशीला घ्यावे

अंधार हळू ढवळावा,

संन्यस्त सुखाच्या काठी

वळिवाचा पाऊस यावा

_ ग्रेस

भय इथले संपत नाही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी