Happy Women's Day 2021: जाणून घ्या कधी आणि का साजरा केला जातो 'आंतरराष्ट्रीय महिला दिन'

लाइफफंडा
Updated Mar 06, 2021 | 11:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

अमेरिकेत 1990 साली पहिल्यांदा एका समाजवादी राजकीय पक्षाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिथे महिला दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला होता. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना मतदानाचा अधिकार देणे हा होता.

International Women's Day
जाणून घ्या कधी आणि का साजरा केला जातो 'आंतरराष्ट्रीय महिला दिवस'  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा इतिहास
  • मतदानासोबतच अन्न आणि कपड्यांचाही अधिकार महिलांना मिळाला
  • जाणून घ्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे महत्व

नवी दिल्ली: दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात (World) आंतरराष्ट्रीय महिला दिवस (International Women’s Day) साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्क (New York) शहरात 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा केला गेला होता. याचे आयोजन अमेरिकेच्या समाजवादी पक्षाने (socialist party) केले होते. तर रशियात (Russia) 1917मध्ये महिलांनी हक्क (rights) आणि सन्मानासाठी (honor) आंदोलन (agitation) केले होते. यानंतर जगभरात महिला दिवस साजरा केला जाऊ लागला. याचा मुख्य उद्देश महिलांचा सन्मान आणि अधिकारांबद्दल लोकांमध्ये जागृती (awareness) करणे हा होता. यावर्षीचा विषय “Women in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world” असा आहे. जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा इतिहास आणि महत्व.

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा इतिहास

ही गोष्ट 1990 सालची आहे. अमेरिकेत 1990 साली पहिल्यांदा एका समाजवादी राजकीय पक्षाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिथे महिला दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा होता. यानंतर एका वर्षाने 1910मध्ये सोशालिस्ट इंटरनॅशनलच्या कोपनहेगन संमेलनात याला दर्जा प्राप्त झाला. तर 1911मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस जगातील अनेक देशांमध्ये आयोजित गेला गेला. 1917मध्ये रशियात महिलांनी अन्न आणि कपड्यांसाठी आंदोलन केले होते.

मतदानासोबतच अन्न आणि कपड्यांचाही अधिकार महिलांना मिळाला

या आंदोलनामुळे तत्कालीन सरकारने महिलांना मतदानाचा तसेच अन्न आणि कपडेही देण्याचा अधिकार दिला होता. त्यावेळेपासून दरवर्षी महिला दिवस साजरा केला जाऊ लागला. पण हा दिवस साजरा करण्याच्या तारखांमध्ये फरक होता. त्याकाळी रशियात ज्यूलियन कॅलेंडर वापरले जात असे तर इतर ठिकाणी ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर होई. यानंतर 8 मार्च 1921 रोजी जगभरात एकत्र आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला.

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे महत्व

समाज आजही आपल्या महिलांना कमकुवत समजतो. महिला या पुरुषांपेक्षा कमी नाहीतच, उलट त्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आज महिलांच्या सहयोगाने पूर्ण जगाचा चौफेर विकास होत आहे. महिलांचे हेच कर्तृत्व साजरे करण्यासाठी आणि समाजातील असमानता दूर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी