Red Ants: तासाभरात घरातून लाल मुंग्या होतील गायब; फक्त करा हे ५ घरगुती उपाय

लाइफफंडा
Updated Jun 14, 2022 | 12:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Red Ants Home Remedies । लाल मुंग्या दिसायला अगदी लहान असल्या तरी एखाद्याला त्यांनी त्रास द्यायचे ठरवले की त्यांच्या पासून सुटका मिळवणे कठीण असते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात या मुंग्यांची दहशत शिगेला पोहोचते.

Red ants will disappear from the house within an hour, Just do these 5 home remedies
या ५ उपायांनी तासाभरातच घरातून लाल मुंग्या होतील गायब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिथे लाल मुंग्या असतील तिथे लिंबू पिळून टाका.
  • लाल मुंग्या घालवण्यासाठी खडूचाही खूप उपयोग होतो.
  • मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी देखील एक प्रभावी औषध आहे.

Red Ants Home Remedies । मुंबई : लाल मुंग्या दिसायला अगदी लहान असल्या तरी एखाद्याला त्यांनी त्रास द्यायचे ठरवले की त्यांच्या पासून सुटका मिळवणे कठीण असते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात या मुंग्यांची दहशत शिगेला पोहोचते. त्या कुठे घराच्या भिंतींच्या कोपऱ्यांवर तर कधी साखरेच्या किंवा गुळाच्या पेटीत लाल मुंग्या ठाण मांडून असतात. इकडे तिकडे भटकणाऱ्या मुंग्या सहसा त्रास देत नाहीत पण चुकूनही मुंगी चावली तर आजीची आठवण येते. अशा परिस्थितीत या मुंग्यांपासून लवकरात लवकर सुटका होणे अत्यंत गरजेचे आहे. या मुंग्यांना हाकलण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय तुम्हाला खूप उपयोगी पडतील. (Red ants will disappear from the house within an hour, Just do these 5 home remedies). 

अधिक वाचा : मिथुन, कर्क आणि मीन राशीच्या लोकांवर राहूची विशेष कृपा

लाल मुंग्यांना हाकलून लावण्याचे घरगुती उपाय

  1. लिंबू - जिथे लाल मुंग्या असतील तिथे लिंबू पिळून टाका किंवा लिंबाची साल ठेवा. लादी पुसताना तुम्ही पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता जेणेकरून जमिनीवर असलेल्या लिंबाचा वास मुंग्यांना पळवून लावेल. कडू आणि आंबट गोष्टी मुंग्यांना घरापासून दूर ठेवतात. 
  2. खडू - लाल मुंग्या घालवण्यासाठी खडूचाही खूप उपयोग होतो. खर तर खडूमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आढळते, ज्याचा वापर मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. मुंग्या ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी खडू पावडर शिंपडा आणि मग त्याचा परिणाम पाहा. खडूने रेषा काढल्यावर लहान कीटकही घरापासून दूर राहतात. लक्षणीय बाब म्हणजे खडू पासून लहान मुलांना नेहमी दूर ठेवावे. 
  3. काळी मिरी - मुंग्यांना साखर जितकी आवडते तितकीच त्यांना काळी मिरी देखील आवडते. काळी मिरी पावडर किंवा काळी मिरी पाण्यात टाकून हे पाणी मुंग्यांवर शिंपडा. असे केल्याने मुंग्या क्षणातच गायब होतील.
  4. मीठ - घरातील कोपऱ्यांवर मीठ शिंपडणे देखील फायदेशीर ठरू शकते. घरातील साधे मीठ तुम्ही फक्त मुंग्यांच्या आवडत्या जागेवर शिंपडू शकता. याशिवाय मीठ पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरूनही वापरता येते. या मिठाच्या पाण्याचे द्रव मुंग्यावर शिंपडल्याने प्रभावी परिणाम पाहायला मिळेल. 
  5. दालचिनी - मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी देखील एक प्रभावी औषध आहे. यासाठी दालचिनी आणि लवंग एकत्र करून मुंग्या येण्याच्या ठिकाणी ठेवाव्या लागतात. घरामध्ये जिथे मुंग्या आहेत तिथे दालचिनी पावडर आणि लवंग ठेवा. त्यासाठी तुम्ही दालचिनी आणि लवंगचे आवश्यक तेल देखील वापरू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी