केदारनाथ 'या' दिवसापासून यात्रा सुरू, यात्रेसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं? जाणून घ्या

kedarnath yatra registration : केदारनाथ यात्रेसाठी २१ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. केदारनाथ यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना नोंदणी अगोदर पूर्ण करावी लागणार आहे.

केदारनाथ 'या' दिवसापासून यात्रा सुरू, यात्रेसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं? जाणून घ्या
Registration continues for Kedarnath Yatra, Yatra starts from this day, know all the details  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केदारनाथ यात्रा सुरू होणार
  • 25 एप्रिलपासून यात्रेला सुरुवात
  • यात्रेकरुंसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

Kedarnath Yatra 2023 : केदारनाथ यात्रा 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केदारनाथ यात्रेसाठी २१ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. केदारनाथ यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना नोंदणी अगोदर पूर्ण करावी लागणार आहे. (Registration continues for Kedarnath Yatra, Yatra starts from this day, know all the details)

अधिक वाचा : मुंबई हायकोर्टात विविध पदांसाठी भरती, शिक्षण केवळ 7वी पास

यात्रेकरुंसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येते. सोनभद्राला पोहोचल्यानंतरच ऑफलाइन नोंदणी करता येते आणि स्लॉटच्या उपलब्धतेनुसार भाविकांना दर्शनाची तारीख दिली जाते. ऑनलाइन नोंदणीसाठी, चार पर्याय आहेत जे भक्त निवडू शकतात, जसे की-

अधिक वाचा : भरमसाठ वीज बिलामुळे त्रस्त?, तर घरावर लावा सोलर पॅनेल
 

असा करा ऑनलाइन अर्ज 

  • टेक्स मॅसेज किंवा व्हॉट्सअॅप: यात्रा टाइप करा आणि मोबाईल नंबर +918394833833 वर पाठवा.
  • तुम्ही टोल-फ्री क्रमांकावरही नोंदणी करू शकता: 01351364.
  • अॅप: तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून टुरिस्ट केअर उत्तराखंड (Tourist Care Uttarakhand) नावाचे अॅप इन्स्टॉल करू शकता. याद्वारे तुम्ही प्रवासासाठी नोंदणीही करू शकता.
  • नोंदणीसाठी निवड करणाऱ्यांनी नोंद घ्यावी की नोंदणी प्रक्रियेसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. संपूर्ण नोंदणी विनामूल्य केली जाते.

कोण अर्ज करू शकत नाही?

  • 6 आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती महिला
  • 13 वर्षाखालील मुले
  • 75 वर्षांवरील वृद्ध

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी