Jawaharlal Nehru vs Feroze Gandhi: असे होते फिरोज गांधी, ज्यामुळे जवाहरलाल नेहरु असायचे चिंतेत

फिरोज गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांची कन्या प्रियदर्शिनी म्हणजेच इंदिरा गांधी यांच्यात जवळीक वाढली होती. तेव्हा १९३३ साली फिरोज गांधी यांनी इंदिरा यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा इंदिरा यांचे वय अवघे १६ वर्षे होते. दोघांमधील वयाचे अंतर आणि धर्माच्या कारणामुळे कमला नेहरु यांनी लग्नाला नकार दिला होता. पंडित नेहरु सुद्धा या लग्नाविरोधात होते. असे असले तरी १९४२ साली इंदिरा आणि फिरोज गांधी यांचे लग्न झाले आणि इंदिरा नेहरु या इंदिरा गांधी झाल्या.

Relationship between Jawaharlal Nehru and Feroze Gandhi
जवाहरलाल नेहरु आणि फिरोज गांधी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फिरोज गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांची कन्या प्रियदर्शिनी म्हणजेच इंदिरा गांधी यांच्यात जवळीक वाढली होती.
  • तेव्हा १९३३ साली फिरोज गांधी यांनी इंदिरा यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
  • १९४२ साली इंदिरा आणि फिरोज गांधी यांचे लग्न झाले आणि इंदिरा नेहरु या इंदिरा गांधी झाल्या.

Relationship between Jawaharlal Nehru and Feroze Gandhi: ६ एप्रिल १९३० रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना झुगारून मिठाचा कायदा मोडला आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. महात्मा गांधीच्या एका आवाजावर भारतीय जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनीही या चळवळीत सहभाग नोंदवला. तेव्हा काँग्रेस नेते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पत्नी कमला नेहरु यांची तब्येत ठीक नव्हती. तरी अलाहबादच्या एका महाविद्यालयात ब्रिटिशांविरोधातील आंदोलनात कमला नेहरु सामील झाल्या. भर उन्हात कमला नेहरु आंदोलन करत असताना बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. तिथूनच दूर एक तरुण कमला नेहरु यांच्या घोषणा ऐकत होता. जेव्हा कमला नेहरु खाली कोसळल्या तेव्हा या तरुणाने धाव घेतली आणि कमला नेहरु यांना सावरले. एका झाडाखाली या तरुणाने कमला नेहरु यांना नेले. त्यांच्यासाठी पाणी मागवले. हा तरुण हातपंख्याने कमला नेहरुंना वारा घालत होता तेव्हा त्यांना शुद्ध आली. या तरुणाने आपल्या मित्रांसोबत कमला नेहरु यांना त्यांचे निवासस्थान आणले. तेव्हापासून हा तरुण कमला नेहरुंचा सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायचा. या तरुणाचे नाव होते फिरोज जहांगीर गांधी. (relationship between indira gandhi husband feroze ghandi and pandi jawaharlal nehru)

फिरोज गांधी हे पारशी समुदायाचे होते. त्यांचे मूळ आडनाव गांधी होते. इंग्रजीत हे नाव Ghandy असे होते, महात्मा गांधी यांच्या सान्निध्यात आल्यानंतर फिरोज गांधी यांनी आपल्या आडनावाचे स्पेलिंग Gandhi लिहिण्यास सुरूवात केली. 

फिरोज गांधींवर नेहरुंचा संशय ? Why did Nehru start doubting on Feroze)

फिरोज गांधी यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यानंतर शिक्षणाला राम राम ठोकला होता. फिरोज गांधी आणि कमला नेहरु यांचे नाते घनिष्ठ झाले होते. तेव्हा अनेक अफवा पसरल्या होत्या. काही समाजकंटकांनी त्यांचे पोस्टरही लावले होते. तेव्हा जवाहरलाल नेहरु तुरुंगात होते. जवाहरलाल नेहरु यांनी आपले जवळचे मित्र आणि स्वातंत्र्यसैनिक रफी अहमद किडवई यांना याबाअबत माहिती घेण्यास सांगितले. किडवई यांनी चौकशी केल्यानंतर यात काहीच तथ्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या काळात फिरोज गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांची कन्या प्रियदर्शिनी म्हणजेच इंदिरा गांधी यांच्यात जवळीक वाढली होती. तेव्हा १९३३ साली फिरोज गांधी यांनी इंदिरा यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा इंदिरा यांचे वय अवघे १६ वर्षे होते. दोघांमधील वयाचे अंतर आणि धर्माच्या कारणामुळे कमला नेहरु यांनी लग्नाला नकार दिला होता. पंडित नेहरु सुद्धा या लग्नाविरोधात होते. असे असले तरी १९४२ साली इंदिरा आणि फिरोज गांधी यांचे लग्न झाले आणि इंदिरा नेहरु या इंदिरा गांधी झाल्या.

फिरोज आणि इंदिरा गांधीमध्ये दुरावा 

सार्‍या जगाशी लढून इंदिरा आणि फिरोज गांधी यांनी लग्न तर केले होते, परंतु लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये विसंवाद निर्माण झाला. त्यामुळे इंदिरा गांधी आपले पिता जवाहरलाल नेहरु यांच्यासोबत रहायला गेल्या. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या आर्थिक स्थितीतही मोठी तफावत होती. फिरोज गांधी हे मध्यमवर्गीय कुटुंबीयातील होते. तर इंदिरा गांधी यांचे वडील आणि आजोबात तेव्हा मोठे वकील होते. पंडित नेहरु हे तेव्हा पंतप्रधान नव्हते तरी त्यांचे राहणीमान हे राजेशाही होते. त्यामुळेच दोन्ही कुटुंबात अंतर निर्माण झाले. एकदा फिरोज गांधी आपल्या दोन्ही मुलांना राजीव आणि संजय गांधीला सुतारकाम शिकवत होते, तेव्हा फिरोज गांधी यांचा एक मित्र तिथे पोहोचला आणि त्याने विचारले. तेव्हा फिरोज गांधी म्हणाले की यांची आई श्रीमंत आहे बाप नाही. त्यामुळे यांना आतापासूनच मेहनत करण्याची सवय झाली पाहिजे म्हणजे त्यांच्यावर भविष्यात सोपे जाईल असे फिरोज गांधी म्हणाले. 

फिरोज गांधी आणि महिलांसोबतचे नाते ? (Rumor, Feroze Gandhi in relationship with many girls even after got married with Indira Gandhi)


जेव्हा इंदिरा गांधी राजकारणात पावलं टाकत होत्या तेव्हा फिरोज गांधी यांचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले. फिरोज गांधी हे एकटे असायचे त्यामुळेच हे झाले असावे असावा अंदाज व्यक्त केला जातो. फिरोज गांधी दिसायला सुंदर होते तसेच बोलण्यातही तरबेज होते. फिरोज गांधी यांच्याकडे महिला आकर्षित व्हायच्या. तेव्हा नेहरु यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या तारकेश्वरी सिन्हा आणि फिरोज गांधी हे जवळ आल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळेच इंदिरा गांधी यांना तारकेश्वरी आवडायच्या नाहीत. नेहरु कुटुंबीयातील एक महिला नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रात काम करत होत्या. तेव्हा या महिलेचे आणि फिरोज गांधीचे संबंध असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. 

या सार्‍या अफवा आणि चर्चांमुळे पंतप्रधान नेहरु अस्वस्थ झाले होते. तेव्हा लखनौमध्ये एका मुस्लिम मंत्र्याच्या मुलीसोबत फिरोज गांधी यांची जवळीक वाढली होती. तेव्हा असे सांगितले जाते की या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी फिरोज गांधी इंदिरा गांधी यांना घटस्फोट द्यायला तयार झाले होते. तेव्हा पंतप्रधान नेहरु यांनी आपल्या मुलीची आणि जावयाची समजूत काढण्यासाठी मित्र किडवई यांना पाठवले. तेव्हा किडवई यांनी दोघांची समजूत काढली आणि हा प्रश्न तिथेच मिटवून टाकला. परंतु या घटनेनंतर पंडित नेहरु आणि फिरोज गांधी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. 

अखेरच्या दिवसांतील फिरोज आणि इंदिरा गांधी यांचे नाते (Relationship Between Indira Gandhi and Feroze Gandhi was not Good)

फिरोज गांधी यांना हृदयसंबंधित आजार होता. १९५७ साली त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर त्यांची सातत्याने तब्येत बिघडत होती. ७ सप्टेंबर १९६० ला फिरोज गांधी यांना पुन्हा एकदा हृदय विकाराचा झटका आला. फिरोज गांधी तेव्हा बेशुद्ध पडले. जेव्हा फिरोज गांधी शुद्धीवर आले तेव्हा इंदिरा गांधी यांचेच नाव घेत होते. तेव्ह फिरोज गांधी यांच्यावर वेलिंग्टन रुग्णालयात उपचार सुरू होते, इंदिरा गांधी यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि रात्रभर त्यांच्या उशाला बसून राहिल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता फिरोज गांधी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते, तेव्हा फिरोज गांधी एवढे लोकप्रिय होते हे आपल्याला माहित नव्हते अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरु यांनी दिली होती. 

सुप्रसिद्ध लेखक डॉम मोरेस यांनी इंदिरा गांधी यांना एका मुलाखातीत प्रश्न विचारला की कुणाच्या मृत्यूमुळे तुम्हाला सगळ्यात जास्त दुःक झाले. तेव्हा इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्या मृत्यूमुळे आपल्याला मोठा धक्का बसला असे सांगितले. इंदिरा गांधी म्हणाल्या की मी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आई वडिलांना आणि आजोबांना जाताना पाहिले. परंतु फिरोज गांधी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे मला मोठा धक्का बसला. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच नाते थोडे क्लिष्ट होते. मला फिरोज गांधी फार आवडत नव्हते परंत माझे त्यांच्यावर प्रेम होते अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधीसोबतच्या नात्यावर प्रकाश टाकला होता. 


फिरोज गांधींवर अन्याय?


फिरोज गांधी यांनी नेहरुंचे जावई होऊन मोठी किंमत चुकवावी लागली असे मत काहींनी व्यक्त केले आहे. १९३० साली फिरोज गांधींनी शिक्षण सोडल्यानंतर स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. तेव्हा फिरोज गांधी यांना १९ महिन्यांसाठी तुरुंगात कैद करण्यात आले होते. फिरोज गांधी फैजाबाद तुरुंगात होते तेव्हा लालबहादू शास्त्रीही या तुरुंगात कैद होते. शेतकर्‍यांसाठी आंदोलनात शास्त्री सहभागी झाले होते. फिरोज गांधी पुन्हा दोन वेळा तुरुंगात गेले. लग्नानंतर काही महिन्यानंतरच भारत छोडो आंदोलनात फिरोज गांधी यांना पुन्हा तुरुंगात टाकले होते. महात्मा गांधी म्हणाले होते की जर माझ्याकडे फिरोज सारखे सात तरुण असते तर सात दिवसांच्या आत भारताला स्वराज्य मिळवून दिले असते. 

फिरोज गांधी यांचे चरित्र लिहिणारे लेखक बर्टिल फॉक यांनी पुस्तकात म्हटले आहे की एवढा संघर्ष करूनही फिरोज गांधींना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली नाही. इंदिरा गांधी यासाठी जबाबदार होत्या. आपल्या महत्वांकाक्षेत पती मध्ये येता कामा नये असे वर्तन इंदिरा गांधी यांनी केले. त्यामुळेच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचेही लेखकाने म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी