नवी दिल्ली: जर तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल आणि तिला प्रपोज करायचे असेल तर त्या मुलीला देखील तुम्ही आवडता का आणि तुमच्या प्रपोजला ती होकार देईल का हे तुम्हाला समजले पाहिजे. असे अनेकदा घडते की जेव्हा मुले मुलीशी त्यांच्या मनातलं बोलतात तेव्हा ती त्याला नकार देते. मुली त्याला 'फक्त मित्र' असा टॅग देतात. त्या मुलीला त्या मुलाला आपला बॉयफ्रेंड म्हणून स्विकारायचं नसतं. मुलींना वाटतं की एखादा मुलगा त्यांचा मित्र असू शकतो पण त्या प्रेम किंवा नातेसंबंधासाठी त्याच्याशी कमिटेड होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत, मुलींना मुलांमध्ये कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेणं आवश्यक आहे.
बॉयफ्रेंड बनवण्यासाठी किंवा रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी बहुतेक मुली मुलांमध्ये काय शोधतात? मुलींच्या आवडीनिवडी जाणून घेतल्यास त्यांच्याशी नाते जोडणे सोपे जाऊ शकते. जाणून घ्या मुलांच्या कोणत्या गोष्टींवर मुली इम्प्रेस होतात, प्रपोजल आल्यावर मग त्या काय विचार करतात.
शारीरिक रूपावर जास्त लक्ष
ब्यूटी सर्वांना आकर्षित करते. मुलगा असो वा मुली, प्रत्येकालाच चांगला दिसणारा जोडीदार हवा असतो. बऱ्याचदा दिसणं काही फरक पडत नाही, पण बहुतेक मुलींना व्यवस्थित शरीर असलेले तंदुरूस्त दिसणारे मुलं आवडतात. मुलाचे पोट सुटले तर मुलींना त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचे नसते. एका सर्वेक्षणानुसार महिलांना उंच पुरुष जास्त आकर्षित होतात. नात्यात येण्यासाठी तुमची शरीर रचनाही महत्त्वाची भूमिका बजावते.
अधिक वाचा- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, हिंगोलीतल्या आमदारानं सोडली शिवसेनेची साथ; शिंदे गटात दाखल
काळजी घेणारी मुलं जास्त आवडतात
जर एखाद्या मुलीला एखाद्या मित्राला जोडीदार बनवायचा असेल तर तिला काळजी घेणारा व्यक्ती जास्त आवडतो. मुलींना त्यांची काळजी घेणारे मुलं आवडतात. म्हणूनच नात्यात येण्यासाठी ती काळजी घेणाऱ्या मुलांकडे लक्ष देते. तिची काळजी घेणाऱ्या मुलांकडे ती आकर्षित होते.
स्थिती आणि पैसा
बहुतेक मुली रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी मुलाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती देखील पाहतात. मुलगा नोकरी करत असेल, जबाबदार असेल तर मुलीवर अशा मुलाचा प्रभाव पडतो. तरुण वयोगट आर्थिक स्थितीकडे जास्त लक्ष देत नसले तरी त्यांना स्टेटस आणि पैसा असलेला जोडीदारही आवडतो.
रोमँटिक जोडीदार
प्रत्येक मुलीला प्रेमळ जोडीदार हवा असतो. मुलगा एखाद्या मुलीवर खूप प्रेम करत असेल, पण जोपर्यंत तो आपले प्रेम व्यक्त करत नाही, काहीतरी रोमँटिक करून मुलीचे मन जिंकत नाही, तोपर्यंत मुली प्रभावित होत नाहीत. मुलींना रोमँटिक पुरुष जास्त आवडतात.