Healthy Relationship Tips in marathi: : प्रेम (love) कोणाला होत नाही. प्रेमात पडणं प्रत्येकांना आवडत. परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत, जे दीर्घकाळापासून एकमेंकांच्या प्रेमात राहूनही ते लग्न (marriage)करत नाहीत. बऱ्याच प्रकरणात लग्नाला नकार हा मुलांकडून येत असतो. प्रेयसीवर जिवापाड प्रेम करणारे तरुण लग्नाला का नकार देतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अर्थात एखाद्या मुलीच्या मनात हा प्रश्न तर निश्चित येत असेल. दीर्घकाळापासून प्रेमसंबंध ठेवले तरी त्याने लग्नाला का नकार दिला. या प्रश्नाने मुली नैराश्यात जात असतात. प्रेयसीला चंद्र सूर्य मिळवून देण्याचा गोष्टी करणारा प्रियकर लग्नाच्या विषयापासून दूर का राहतो. लग्नाला का नकार देतो याची काही कारणे आहेत, ते आपण आज जाणून घेणार आहोत. (Why doesn't a Boyfriend marry his girlfriend despite being in a relationship for a long time? Find out why)
अधिक वाचा : स्वप्नात आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला पाहून शुभ की अशुभ
बहुतेक मुलं प्रेम संबंधात असतात. परंतु ते त्यांचे नाते चारचौघात दाखवत नाही किंवा त्याची कबुली करत नाहीत . कारण त्यांना समाजाची भिती त्यांना असते. जर तुम्ही नात्यात आहात आणि त्याविषयी गंभीर आहात तर त्याची कबुली द्या. समाजाची फिकीर करू नका. जर तुम्ही समाजाला घाबरत असाल तर तुम्ही तुमच्या नात्याला न्याय देऊ शकणार नाहीत.
अधिक वाचा : तुमच्या या चुका खराब करतील लिव्ह-इन-रिलेशनशिप
बहुतेक मुलं दीर्घकाळापासून मुलीसोबत प्रेमसंबंधात राहतात. परंतु मुलं त्यांच्या प्रेमाविषयी किंवा त्यांच्या नात्याविषयी पालकांना सांगत नाहीत. कारण त्यांना घरच्यांची मत राखायचं असतं. तसेच संपत्ती, नातेसंबंधाचे हित जपण्याचेही कारण असते.
अधिक वाचा : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश
पण तुम्ही जर दीर्घकाळापासून प्रेम संबंधात आहात तर तुमच्या प्रेयसीला तुमच्या पालकांशी भेटवा. मैत्रिण म्हणून तरी तुम्ही तिची भेट पालकांशी करून देऊ शकतात. मात्र वारंवार सांगूनही जर तुम्ही तुमच्या प्रेयसीला पालकांना भेटवलं नसेल तर मुलगी तुमच्याशी संबंध तोडू शकते.
बरेच मुलं त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल खूप गोंधळलेले असतात, ते निश्चितपणे एखाद्या मुलीच्या प्रेमात अडकतात, परंतु ते अॅरेंज मॅरेजवर अधिक विश्वास ठेवतात. प्रेमविवाह यशस्वी होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते, त्यामुळे प्रेयसीकडून वारंवार विनंती करूनही ते लग्नाचे प्रकरण पुढे ढकलत राहतात आणि हळूहळू हे नाते संपुष्टात येते. प्रेयसीसोबत लग्न केल्यानं आदर राहणार नाही अशा भीतीपोटीमुळेही अनेक मुलं लग्नास नकार देतात.
अधिक वाचा : ऑफिसमधील सहकाऱ्यासह प्रेम जुळणं आहे धोक्याचं
बहुतेक मुलं कदाचित वर्किग मुलीशी प्रेम करू शकतात. परंतु लग्नानंतर मुलीने काम करू नये असं मुलांना वाटतं. त्यामुळे जर प्रेयसी लग्नानंतरही नोकरी करण्याचं म्हणत असेल तर मुलं त्याला नकार देतात आणि नाते संपवत असतात. बायकोने फक्त घरची कामे करावीत आणि ऑफिसला जाण्याबद्दल बोलू नये, अशी त्यांची इच्छा असते.