Relationships Tips: प्रेमात ब्रेकअप झालंय? या सात कारणांमुळे प्रेमी आपल्या जोडीदाराला करतात Cheat

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 24, 2023 | 21:48 IST

Relationship Tips: प्रेमाच्या (loveship) नात्यात फसवणूक होत असल्याने अनेकांचे नाते तुटूत असतात. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर जोडीदार आपल्या साथीदाराला माफ करत नाही. परंतु आपल्या जोडीदाराकडून फसवणूक झाल्यामुळे व्यक्ती मानसीक आणि शारीरिक पद्धतीने कमजोर होत असतो.

Have you break up in love? These are  seven reasons why lovers cheat their partners
रिलेशनशिपमध्ये धोका का मिळतो? अभ्यासात समोर आली ही कारणे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला धोका देत असतात?
  • जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमध्ये मिळतील ब्रेकअपची कारणं
  • अनेकांना फसवणूक करण्यात आनंद वाटत असतो.

Relationship Tips: प्रेमाच्या (loveship) नात्यात फसवणूक होत असल्याने अनेकांचे नाते तुटूत असतात. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर जोडीदार आपल्या साथीदाराला माफ करत नाही. परंतु आपल्या जोडीदाराकडून फसवणूक झाल्यामुळे व्यक्ती मानसीक आणि शारीरिक पद्धतीने कमजोर होत असतो. त्याचबरोबर तो आपली फसवणूक का झाली हा प्रश्न स्वत:ला विचारत असतो.   (Have you broken up in love? These are  seven reasons why lovers cheat their partners)

अधिक वाचा  : रिलेशनशिपमध्ये या गोष्टी कधीच खपवून घ्यायच्या नाहीत

प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला धोका देत असतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर तुम्हाला जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमध्ये मिळेल. शोधकर्त्यांनी 500 लोकांशी चर्चा केली आहे, ज्यांनी आपल्या पार्टनरला धोका दिला किंवा त्यांची फसवणूक केली आहे. यात अशी कारणे समोर आली आहेत, ज्यामुळे जोडीदार आपल्या साथीदाराची फसवणूक करण्यास प्रेरित होत असतात. 

अधिक वाचा  : स्वप्नात आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला पाहून शुभ की अशुभ


काय आहेत कारणं 


 नात्यात कंटाळा येणे 

 नात्यात आल्यानंतर जोडीजार आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत खूप काही गप्पा करत असतात. आपल्या व्यक्तीशिवाय एक मिनीट घालवणं सुद्धा अशक्य वाटतं. परंतु काही काळानंतर ही उत्सुकता नष्ट होते आणि आपल्या जोडीदाराशी चर्चा करण्यासाठी काहीच विषय नसतात. सोबत राहत असले तरी एकमेकांना एकमेकांविषयी आवड राहत नाही. अशा परिस्थितीत, पूर्वीची भावना पुन्हा जिवंत करण्यासाठी बरेच लोक दुसर्‍याशी संबंध बनवतात.

अधिक वाचा  : तुमच्या या चुका खराब करतील ​लिव्ह-इन-रिलेशनशिप​

मोमेंटमध्ये वाहून जाणे 

काही लोक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे जोडीदारावर प्रेम असूनही ते क्षणार्धात कोणशीही संबंध प्रस्थापित करत असतात. किंवा जेव्हा कोणी त्यांच्याशी फ्लर्ट करते तेव्हा ते त्यास नकार देऊ शकत नाहीत. या सर्वांमध्ये, तो आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहे याची त्याला अजिबात पर्वा नसते. मात्र, असे अनेक लोक स्वत: जोडीदारासमोर आपली चूक मान्य करतात.

ते करण्यात आनंद वाटतो 

मोठ्या संख्येने लोक फसवणूक करतात कारण त्यांना त्यात आनंद वाटत असतो. त्यामुळे त्यांना पकडले जाण्याची भीती वाटत नाही. बरेचदा लोक हे केवळ रोमांच करण्याच्या उद्देशाने करतात. यामध्ये मोठ्या संख्येने लोकही सामील आहेत, जे आपल्या जोडीदारावर आनंदी आहेत.

अधिक वाचा  : जोडीदाराशी मेसेजमध्ये या गोष्टी नका बोलू, नाहीतर...

जोडीदाराचं लक्ष न मिळणं  

नात्यात फसवूणक होत असते त्यातील सर्वात मोठं कारणं म्हणजे आपल्या पार्टनरने आपल्या लक्ष न मिळणं. म्हणजेच तुम्ही काहीही केलं तरी तुमचा पार्टनर तुमच्याकडे पाहत नाही. किंवा त्याला अधिक महत्त्व देत नाही. तुमचं कधीच कौतुक करत नाही. यामुळे अनेक लोक आपल्या नात्यातून दूर जाण्याचा पर्याय निवडत असतात. नवीन कोणाच्या प्रेमात पडल्यानंतर आपल्याला परत महत्त्व प्राप्त होईल, असं अनेकांना वाटतं. 

लैंगिक विविधतेची इच्छा

प्रत्येकाची फँटसी वेगळी असते. जेव्हा जोडीदारांमध्ये रोमान्सबाबत समानता नसते, तेव्हा नात्यात लवकरच कंटाळा येतो. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या लैंगिक कल्पनेसाठी आणि विविधतेसाठी जोडीदाराची फसवणूक करून इतर कोणाशी तरी संबंध प्रस्थापित करत आपली इच्छा पूर्ण करत असतो. 

अधिक वाचा  :  संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश

जोडीदाराशी बदला घेणे 

बहुतेकवेळा अनेकजण आपल्या पार्टनरला धडा शिकवण्यासाठी जाणूनबुजून त्यांची फसवणूक करतात आणि दुसऱ्यांशी संबंध निर्माण करतात. हे नेहमी नात्यात होत असतं. जे लोक प्रामाणिक असतात त्यांना  नात्यात धोका मिळत असतो. फसवणूक करणारे सुमारे निम्मे लोक हे रागामुळे त्यांच्या भागीदारांना फसवतात.

टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी 

दीर्घकाळापासून नात्यात राहिल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीची सवय होऊ जात असते. परंतु याचा दुष्परिणाम हा नात्यावर हो असतो. यात अनेकजण आपल्याला चुकीच्या पद्धतीने वागणूक देत असतात.  छोट्या-छोट्या कारणावरुन भांडण उकरून काढत असेल तर त्यात नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात दुसरा व्यक्ती जर तुम्हाला मान-आर देत असेल तर आपण त्याच्याकडे वळत असतो. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी