Republic Day 2022 Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करू शकतात भाषणाची तयारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त, शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी  भाषण करतात.  यावर्षीही काही शाळांमध्ये ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन  विद्यार्थी हा कार्यक्रम साजरा करतील, टाइम्स नाऊ मराठी भाषणासाठी काही टिप्स देणार आहे, ज्या तुम्ही या दिवशी वापरू शकता.

republic day 2022 speech in marathi  students can prepare their speeches online or offline in following ways
प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणाची तयारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
  • या दिवशी नागरिक पहाटे उठून परेड पाहण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक कार्यक्रमात ध्वजारोहणात सहभागी होतात.
  • . यावर्षी बुधवारी, 26 जानेवारी 2022 रोजी देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

Republic Day 2022 Speech in Marathi: भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक पहाटे उठून परेड पाहण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक कार्यक्रमात ध्वजारोहणात सहभागी होतात. यावर्षी बुधवारी, 26 जानेवारी 2022 रोजी देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. 1950 मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त, शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी  भाषण करतात.  यावर्षीही काही शाळांमध्ये ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन  विद्यार्थी हा कार्यक्रम साजरा करतील, टाइम्स नाऊ मराठी भाषणासाठी काही टिप्स देणार आहे, ज्या तुम्ही या दिवशी वापरू शकता. (republic day 2022 speech in marathi  students can prepare their speeches online or offline in following ways)


प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण


सुप्रभात.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.

नमस्कार, माझे नाव………………………. मी इयत्ता…….. मध्ये शिकतो. आज मी आपल्या समोर २६ जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज स्वतंत्र भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. परंतु, २६ जानेवारी १९५० रोजी पासून हे संविधान अंमलात आले.  म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

आता प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? तर याचा अर्थ असतो कि लोकांचे, लोकांनी, लोकांकरिता चालवीत असलेले राज्य. प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश कि ज्याचा मध्यबिंदू हा देशातील लोक असतात. या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात. देशावर कुण्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवीत असतात.

अधिक वाचा : ​Happy Republic Day 2022 Messages : महान नेत्यांचे विचार

नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच,

समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक,

गुलामगिरी संपली, झाले गणराज्य,

सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक

आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत यासाठी कितीतरी देशभक्तांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळालेले नसून यामागे शेकडो वर्षांचा स्वातंत्र्याचा लढा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आहे. मंगल पांडे, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा असे कितीतरी देशभक्तांनी स्वतः च्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्य युद्धात दिलेली आहे.

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,

अनेकांनी केले बलिदान.

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ भारत मातेचे गुणगान

अधिक वाचा : ​गोरखा जवानाचा खुखरी डान्स व्हायरल

अखेर जवळपास १५० वर्षांनी ब्रिटीशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आता हा देश कुणाच्याही गुलामगिरीत नव्हता. मग या देशाचा कारभार चालविण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे तयार करून स्वीकारण्यात आले. परंतु २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता.

अशा प्रकार एकदम हर्षोल्लासात देशाच्या कान्या कोपऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा, आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानाचा नेहमी आदर केला पाहिजे. ते होते म्हणून आज आपण हा कार्यक्रम साजरा करू शकत आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे.

आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो. आपण सर्वांनी माझे दोन शब्द शांतता पूर्वक  ऐकून घेतले त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.

जय हिंद, जय भारत……….. धन्यवाद!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी