Tips for staying in hotel: अनेक महिला (women) त्यांच्या कामानिमित्त जगभर प्रवास करत असतात. काहीजणींना फिरण्याची (Tourism) आवड असते. त्यासाठीही त्या वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या देशांत फिरत असतात. काहीजणींना एकटीने प्रवास करण्याच्या साहसी प्रकाराचा आनंद घेण्यात रस असतो, तर काहीजणींना कामानिमित्त घराबाहेर राहण्याचे प्रसंग येतात. अशा वेळी त्यांना कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये उतरावं लागतं आणि तिथे मुक्काम करावा लागतो. अशा मुक्कामात अनेक महिलांना भिती (Fear) वाटत असते. एकटीने हॉटेलवर राहण्याची कल्पनाही काहीजणींना भयावह वाटत असते. ही भिती कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या जातात. त्यांचा अवलंब केला, तर हॉटेलवर राहणं अधिक सोपं आणि कमी भीतीदायक ठरू शकेल.
बुकिंग करताना तुमचं पूर्ण नाव सांगू नका. तुम्ही महिला आहात, याची आगाऊ कल्पना दिली जाणार नाही, याची खबरदारी घ्या. त्यासाठी तुम्ही तुमच्या मधल्या नावाचा किंवा आडनावाचा वापर करू शकता.
शक्यतो, राहण्यासाठी तळमजल्यावरील खोलीची निवड करा. त्यामुळे तुम्ही सहजपणे रिसेप्शनपर्यंत पोहोचू शकाल आणि कुणाची ना कुणाची मदत मिळणं, शक्य होईल. त्याशिवाय भूकंप येणे, आग लागणे यासारख्या दुर्घटनांवेळीदेखील तुम्ही लवकर तिथून सुटका करून घेऊ शकाल.
अधिक वाचा - Hidden Camera in oyo : ओयो रूम किंवा लॉजच्या रूममध्ये कॅमेरा लपवून तर नाही ना ठेवला? अशा प्रकारे घ्या शोध
कधीही इतरांसमोर तुमचा रुम नंबर जाहीर करू नका. एखाद्या समाजकंटकाला तुमचा खोली नंबर समजला, तर त्याचा गैरवापर तो करू शकतो. मात्र तुम्ही खोलीचा नंबरच गुप्त ठेवलात, तर तशी संधीच कुणाला मिळणार नाही.
जोपर्यंत हॉटेलमध्ये चेक-इनची पूर्ण प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत तुमच्या सामानाची पूर्ण काळजी घ्या. चेक-इनच्या प्रक्रियेत सामान नेहमी तुमच्या पायापाशी आणि नजरेच्या टप्प्यात राहिल, याची खबरदारी घ्या.
खोलीतील एका टेबलवर काही कॉन्टॅक्ट नंबर जरूर लिहून ठेवा. इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकाल. तुमचा मोबाईल जर चोरीला गेला, तर तुम्ही इतर फोनवरून अपेक्षित व्यक्तींना कॉल करू शकाल.
अधिक वाचा - Rats control: ठार न मारता घरातील उंदीर लावा पळवून, करा ‘हे’ पाच उपाय
रुमममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची नीट तपासणी करा. खोलीत कुठे सीसीटीव्ही कॅमेरा तर लपवलेला नाही ना, याची खातरजमा करा. त्याशिवाय सर्व दारं आणि खिडक्या लॉक आहेत की नाही, हेदेखील तपासून पाहा.
जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमचा दरवाजा ठोठावला, तर उघडू नका. पूर्वकल्पना दिल्याखेरीज कुणालाही खोलीत न पाठवण्याची सूचना रिसेप्शनला अगोदरच देऊन ठेवा.
डिस्क्लेमर - हॉटेलमधील सुरक्षेबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.