शरीराला ऊर्जा देणारा आरोग्यदायी साबुदाणा!

health benefits of eating sabudana उपवास आणि साबुदाणा यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जाणून घ्या साबुदाणा खाण्याचे फायदे...

sago starch or tapioca starch used for making sabudana, health benefits of eating sabudana
शरीराला ऊर्जा देणारा आरोग्यदायी साबुदाणा! 

थोडं पण कामाचं

  • शरीराला ऊर्जा देणारा आरोग्यदायी साबुदाणा!
  • साबुदाणा खाण्याचे फायदे
  • साबुदाणा कसा तयार करतात?

मुंबईः पांढरे, मोत्यासारखे दिसणारे छोट्या आकाराचे गोल दाणे असे साबुदाणा या पदार्थाचे थोडक्यात वर्णन करता येईल. उपवास आणि साबुदाणा यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, साबुदाणा खीर, साबुदाणा पापड, साबुदाणा चकली असे साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. साबुदाणा पचण्यासाठी जड असतो त्यामुळे साबुदाण्याचे पदार्थ मर्यादीत प्रमाणात खावे. साबुदाण्याचा अतिरेक नव्या आजारांना आमंत्रण देऊ शकतो याचे भान ठेवावे. (sago starch or tapioca starch used for making sabudana, health benefits of eating sabudana)

झाडावर उगतो की मशीनवर तयार केला जातो साबुदाणा, जाणून घ्या

साबुदाणा खाण्याचे फायदे

  1. साबुदाणा या पदार्थात मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात. साबुदाणा शरीराला उष्मांक देतो. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. यामुळेच उपवासाच्या दिवशी साबुदाणा खातात. पण साबुदाणा अती प्रमाणात खाणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे उपवासाच्या निमित्ताने साबुदाणा हा पदार्थ खाल्ला तरी त्याचे प्रमाण मर्यादीत असावे. 
  2. थकवा जाणवत असेल तर अनेकदा साबुदाणा खिचडी अथवा साबुदाणा खीर हे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. 
  3. गरोदरपणात तसेच आजारी असलेल्या व्यक्तीला, आजारपणामुळे तोंडाची चव गेलेल्या व्यक्तीला साबुदाणा खिचडी अथवा साबुदाणा खीर हे पदार्थ खाण्यास सुचवले जाते. यामागचे मोठे कारण साबुदाण्यातून मिळणारे उष्मांक हेच आहे.
  4. वजन साधारण प्रमाणापेक्षा कमी असल्यास साबुदाण्याचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
  5. साबुदाणा पाण्यात मिसळून त्यापासून तयार केलेला फेसमास्क चेहऱ्याला लावावा. चेहरा उजळण्यास मदत होते. सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

साबुदाणा कसा तयार करतात?

सॅगो किंवा सॅगो पाम या 'पाम ट्री' प्रकारातील झाडाच्या खोडातून निघणारा चिक वापरून तसेच कसावा (टॅपिओका) या वनस्पतीच्या कंदमुळाचे दूध काढून त्यापासून साबुदाणा तयार केला जातो. यासाठी मुळांवरचे साल काढून ते पाण्यासोबत दळतात. नंतर दळलेला माल चाळणीतून गाळल्यावर खाली राहिलेल्या द्रवात स्टार्च तरंगत्या स्थितीत असतो तो टाकीमध्ये तळाला बसू देतात. नंतर तो पुन्हा पुन्हा धुऊन वाळवितात व बारीक चाळणीतून चाळतात. स्टार्च तयार करण्याच्या कृतीमध्ये टाकीमध्ये तळाला बसलेला स्टार्च उन्हामध्ये ५०% पाण्याचा अंश राहीपर्यंत वाळवितात. नंतर कापडी पिशव्यांत घालून त्या स्टार्चच्या गोळ्या (एक प्रकारची बुंदी) बनवतात अथवा अथवा यंत्राच्या साहाय्याने गोळ्या पाडतात. या गोळ्या म्हणजेच साबुदाणा. हा साबुदाणा निरनिराळ्या आकारांच्या चाळण्यांतून चाळतात. खोबऱ्याचे तेल चोपडलेल्या कढईमध्ये साबुदाणा १५ मिनिटे भाजतात. यामुळे साबुदाणा गुळगुळीत होऊन त्याला चकाकी येते. नंतर साबुदाणा वाळवतात. ताज्या मुळांच्या वजनाच्या सुमारे २५ टक्के एवढे साबुदाण्याचे उत्पादन मिळते. 

तामीळनाडूतील सालेम जिल्ह्यात साबुदाणा निर्मिती एक मोठा व्यवसाय

दुसऱ्या महायुद्धापासून इंडोनेशियातून साबुदाण्याची भारतात आयात बंद झाली. साबुदाणा तयार करण्यासाठी टॅपिओकाचा स्टार्च फार उपयुक्त आहे, असे आढळून आल्यावर टॅपिओकापासून स्टार्च आणि साबुदाण्याच्या निर्मितीला भारतात चालना मिळाली. तामीळनाडूत १९७० मध्ये स्टार्च व साबुदाणा तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत. यातील बहुसंख्य कारखाने सालेम जिल्ह्यात आहेत. तिथले वातावरण साबुदाणा निर्मितीला अनुकूल आहे. साबुदाणा निर्मिती प्रक्रियेत खाली उरणारा लगदा जनावरांना खाऊ घालतात किंवा हलक्या प्रतीच्या पिठाच्या निर्मितीसाठी वापरतात. 

स्टार्चच्या प्रतीवर ठरते साबुदाण्याची गुणवत्ता

साबुदाणा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्टार्चच्या प्रतीवर साबुदाण्याची गुणवत्ता अवलंबून असते. टॅपिओकापासून तयार केलेला साबुदाणा रंग, आकार आणि तो विस्तवावर किती प्रमाणात भाजला गेला आहे यावर आधारित अशा चार प्रकारच्या प्रतींमध्ये वेगवेगळा केला जातो. क्रमांक १ प्रतीचा साबुदाणा दुधासारखा पांढरा आणि चांगला भाजलेला (परतलेला) असतो आणि तो गुणवत्ता आणि पोषणमूल्य याबाबतींत परदेशी साबुदाण्याच्या तोडीचा असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी