Sambhaji Maharaj Jayanti 2022 Wishes : संभाजी महाराज तारखेनुसार जयंतीच्या मराठी शुभेच्छा शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबई यांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. आज संभाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आहे, यानिमित्ताने जगभर असलेले मराठीजन एकमेकांना शुभेच्छा देतात. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तन शेअर करा मराठी शुभेच्छा, Facebook Stories, WhatsApp Stories Instagram Stories वर.

sambhaji maharaj jayanti 2022
संभाजी महाराज जयंती 2022 
थोडं पण कामाचं
  • संभाजी महाराज जयंती 2022
  • आज तारखेनुसार संभाजी महाराजांची जयंती आहे.
  • जयंतीनिमित्तन शेअर करा मराठी शुभेच्छा, Facebook Stories, WhatsApp Stories Instagram Stories वर.

Sambhaji Maharaj Jayanti 2022 massages in marathi  : मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबई यांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे संभाजी महाराज यांनी रणभूमीवर पराक्रम गाजवला. आज संभाजी महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती आहे, यानिमित्ताने जगभर असलेले मराठीजन एकमेकांना शुभेच्छा देतात. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तन शेअर करा मराठी शुभेच्छा, Facebook Stories, WhatsApp Stories Instagram Stories वर.

संभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

सह्याद्रीच्या उरात खदखदणारा
ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराज
जय शंभुराय.

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म,
हे संभाजी प्रणाम तूजला कोटी कोटी…!

संभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,
परी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,
झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,
स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,
शुर,वीर जसे सुर्याचे तेज साजे,
असा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजे
शंभुराजे जयंतीच्या शुभेच्छा!

रुद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता अरे
विचारा त्या सह्याद्रीला
माझा शंभूराजा कसा होता!
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या जयंती निमित्त
हार्दिक शुभेच्छा.

संभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी