Sambhaji Maharaj Punyatithi 2023 Messages: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस करा अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi Message in marathi:। संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.

sambhaji maharaj punyatithi 2023 marathi messages whatsapp status hd images to salute his sacrifice for maratha empire on his death anniversary
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मेसेज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
  • राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू शंभूराजांना लहानपणापासूनच मिळाले होते.
  • मराठ्यांच्या इतिहासात संभाजी राजांनी मोठी कामगिरी केली आहे.

Sambhaji Maharaj Punyatithi 2023 Messages in marathi : संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू शंभूराजांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजी महाराज लहान असतानाचं त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे संभाजी महाराजांचा सांभाळ राजमाता जिजाबाई यांनी केला. शिवाजी महाराजांप्रमाणेच शंभूराजांनी मराठा साम्राजाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.


मराठ्यांच्या इतिहासात संभाजी राजांनी मोठी कामगिरी केली आहे. आज संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages 1

एक छोटे पाऊल लहान ध्येयाकडे नेतो,

परंतु तेच छोटे लक्ष नंतर मोठे लक्ष्य प्राप्त करू शकते.

पुण्यतिथीनिमित्त संभाजी महाराज यांना शत् शत् नमन

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages 2


शत्रू कमकुवत आहे याचा जास्त विचार करू नका,

आणि त्यांच्या सामर्थ्याला जास्त महत्व देऊ नका.

पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages 3
संभाजी सांगायला सोपे आहेत, संभाजी ऐकायला सोपे आहेत,

संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,

पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..

आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,

तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!

संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punyatithi 2022 Messages 4

शिवाजी महाराज यांचे वीरपुत्र

संभाजी महाराज यांना शत् शत् नमन

पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!


दरम्यान, इ.स. 1689 मध्ये संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना दगाफटका करून औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखानने संभाजीराजे व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. त्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत निघृणपणे त्यांना ठार मारण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी