sant gadge baba : संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करायचे मराठी भाषण

sant gadge baba punyatithi marathi bhashan, sant gadge baba death anniversary marathi speech : गाडगेबाबा हे हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक

sant gadge baba
sant gadge baba : संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करायचे मराठी भाषण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • sant gadge baba : संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करायचे मराठी भाषण
  • जन्म : शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी १८७६ रोजी झाला
  • निधन : अमरावती जिल्हा येथे 20 डिसेंबर 1956 रोजी झाले

sant gadge baba punyatithi marathi bhashan, sant gadge baba death anniversary marathi speech : गाडगेबाबा हे हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक. विसाव्या शतकातील महापुरुष. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. पण सर्वजण त्यांना गाडगे बाबा या नावाने ओळखत. गाडगे बाबांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जणोरकर होते. गाडगे बाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. ते किर्तनातून समाजाचे प्रबोधन करत होते. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या विरोधात जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर पुरुष म्हणजे संत गाडगेबाबा.

जनतेकडून घेतलेल्या देणग्यांमधून संत गाडगेबाबा यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता. 

गाडगे बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. गाडगे बाबांचे चरित्र प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिले.  सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. असे महान कार्य करणाऱ्या गाडगे बाबांचे अमरावती जिल्ह्यात 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी मंगळवार 20 डिसेंबर 2022 रोजी आहे. या निमित्ताने संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करायचे मराठी भाषण....

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करायचे मराठी भाषण
sant gadge baba punyatithi bhashan marathi
sant gadge baba punyatithi marathi bhashan 
sant gadge baba punyatithi speech in marathi
sant gadge baba death anniversary marathi speech
sant gadge baba death anniversary speech in marathi

'तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी' असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा. गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी राहत होते. त्यांचे बालपण मामाकडे गेले.

डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. डेबूजीच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची राखण करणे त्यांना फार आवडे. डेबूजी लहान असताना त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी गेले. 

डेबुजीच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजीचे लग्न लहानपणी झाले होते. त्यांना चार मुली होत्या पण ते संसारात फारसे रमले नाही. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

गाडगेबाबा ११ फेब्रुवारी १९०५ रोजी घराचा त्याग करून संन्यास घेऊन तीर्थाटन करण्यासाठी निघाले. त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे.

अंगावर गोधडीवजा फाटके तुकडे कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयष्य वेचले. ते किर्तनातून लोकांना अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत. त्यांचे उपदेश साधे सोपे होते. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

संत गाडगेबाबा ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. असे महान कार्य करणाऱ्या गाडगे बाबांनी अमरावती जिल्ह्यात 20 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. अशा या महान संताला विनम्र अभिवादन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी