Gadge Maharaj Death Anniversary : मुंबई : संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा (Gadge Maharaj) हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. अशा या थोर कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेच्या पूजाऱ्याची आज (20 डिसेंबर) 66 वी पुण्यतिथी. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणारे मेसेज
अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे
संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने
कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
जय गोपाला
जय गाडगेबाबा
कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना पुण्यस्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन
स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक, ग्रामसुधारणेचे जनक
श्री संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन !
‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’
असे सांगत दीन,दुबळे, अनाथ,
अपंगांची सेवा करणारे थोर संत
गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी.
विनम्र अभिवादन
संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार
1.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.
2.जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.
3.दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका
4.दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.
5.दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.
6.धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.
7.माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.
8.माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.
9.शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
10.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.