Savitribai Phule 192th Jayanti : आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आज जयंती! सावित्रीबाईची ओळख महाराष्ट्राला समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची पत्नी अशी असली तरीही त्या कवियित्री, समाजसुधारक आणि भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रात सातारा येथील नायगाव मध्ये झाला. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू केली. केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांना देखील छेद देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे. आज या क्रांतीज्योतीच्या 192 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी काही मराठी शुभेच्छापत्र, HD Images, Wallpapers, Photos व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. (Savitribai Phule Jayanti 2023 : Massages Images, History and Significance)
महाराष्ट्रात राज्य सरकारने आता दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी हा दिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा त्याच पहिलंच वर्ष असणार आहे. मग या निमित्ताने या समाजसुधारकेला नक्की आपली आदरांजली अर्पण करा.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
“घडलो नसतो मी जर
शिकली नसती माझी माय,
जर नसत्या सावित्रीबाई तर
कशी शिकली असती माझी माय.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
“आजचा दिवस खास आहे,
सावित्री आईचे उपकार आहेत.”
सावित्रीबाई फुले यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन
आशिया खंडातील प्रथम शिक्षिका,
कवयित्री आणि थोर समाज सुधारक
आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी
सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
“शिक्षणाची प्रणेती,
विद्देची जननी असलेली
हि खरी सरस्वती आहे,
बघा ना स्त्री म्हणजे या
जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन