Marathi Bhasha Din 2023 Messages: मराठी राजभाषा दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा संदेश; Wishes, Quotes, Greetings शेअर करुन जागवा मातृभाषेचा अभिमान!

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 27, 2023 | 10:44 IST

Marathi Bhasha Din 2023 messages in Marathi :   आपल्या मराठमोळ्या बांधवांना  मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रॅम या माध्यमातून हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही मातृभाषेचा अभिमान जागवू शकता. 

Marathi rajBhasha Din 2023 Messages
मराठी राजभाषा दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा संदेश;  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 27 फेब्रुवारी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती.
  • वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांना साहित्य विश्वातला मानाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' (Marathi Language Day) म्हणून साजरा केला जाऊ लागला.
  • प्रत्येक मराठी माणसासाठी अभिनामाचा असणारा हा दिवस.

Marathi Bhasha Din 2023 Marathi Wishes :  आपल्या मराठमोळ्या बांधवांना  मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रॅम या माध्यमातून हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही मातृभाषेचा अभिमान जागवू शकता. ( Send Marathi Greetings Messages on Marathi rajbhasha Day; Share Wishes, Quotes, Greetings and make your mother proud! )

अधिक वाचा  : दादा! sorry म्हणजे सॉरी नव्हे; काही तरी वेगळचं आहे हे प्रकरण

Marathi rajbhasha Dayमराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2023

मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळ
मराठी भाषा आहेच अशी रसाळ
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi rajbhasha Dayमराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2023

मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला
लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2023

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत

आमची माय मराठी

अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते

आमची माय मराठी

संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे

आमची माय मराठी

नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही

आमची माय मराठी

मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Marathi rajbhasha DayMarathi rajbhasha Day 2023

जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi rajbhasha DayMarathi rajbhasha Day 2023

आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi rajbhasha DayMarathi rajbhasha Day 2023

माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी,
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

marathi raj bhasha मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2023

माझा शब्द माझे विचार ,माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी ,माझी माय मराठी !! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2023

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 2023

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी