Martyr's Day 2023 Shaheed Din quotes in marathi: भारतातील ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढणारे क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती. ज्यावेळी भगत सिंग यांना फाशी देण्यात आली तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होते. हेच भगत सिंग नंतर देशातील तरुणांसमोर आदर्श बनले. भगत सिंग स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी देशाला वाहून घेण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली होती. यासाठी त्यांनी आधी हिंदुस्थान रिपब्लिक सोशालिस्ट या संस्थेत सहभागी झाले होते. त्यानंतर 1925 साली संघटितरित्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले आणि नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली. (Bhagat Singh Rajguru Sukhdev smruti din)
सायमन कमिशनच निषेध करताना एका ब्रिटिश अधिकार्याने लाला लजपतराय यांच्या डोक्यात लाठी घातली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी भगत सिंग आणि त्यांच्या सहकर्यांनी एका ब्रिटिश अधिकार्याची गोळ्या घालून हत्या केली. तसेच ब्रिटिशांचे दोन अन्यायकारी कायद्याच्याविरोधात बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकले. या आणि इतर आरोपांची शिक्षा म्हणून भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भगत सिंग अवघ्या 23 व्या वर्षी देशासाठी फासावर गेले. त्यांच्या स्मृतीनिमित्त 23 मार्च हा दिवस देशात शहीद दिन साजरा केला जातो. या निमित्ताने त्यांचे अनमोल विचार...
शहीद भगत सिंग यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
शहीद भगत सिंग यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
शहीद भगत सिंग यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
शहीद भगत सिंग यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
शहीद भगत सिंग यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन