Happy BR Ambedkar Jayanti 2022 Quotes, Images, Status in Marathi: : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर त्यांचे अनमोल विचार WhatsApp Status, Images

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांचे अनमोल सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर करा. Happy BR Ambedkar Jayanti 2022 Quotes, Images, Status in Marathi

Dr. Bhimrao Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.
  • १४ एप्रिल रोजी मध्य प्रदेशच्या महु येथे त्यांचा जन्म झाला होता.
  • या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर करा.

Dr Babasaheb Ambedkar Quotes : १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशमधील महु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. संविधानाचे शिल्पकार अशी बाबासाहेबांची ओळख आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकावरच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तसेच बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेवर प्रहार करून स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवण्याचे महत्कार्य केले. चवदार तळ्यातील पाणी पिऊन त्यांनी अस्पृश्यांनाही पाणी पिण्याचा हक्क आहे हे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री होती, त्यांनी या देशाला संविधान दिले. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. आज १४ एप्रिल त्यांची जयंती आहे, या निमित्ताने त्यांचे अनमोल विचार सोशल मीडियावर शेअर करा
 

वाचाल तर वाचाल

संविधान कितीही चांगले असले तरी राबवणारे लोक वाईट असतील तर ते वाईट ठरेल आणि 
संविधान कितीही वाईट असेल तरी ते राबवणारे लोक चांगले असतील तर ते चांगले ठरेल. 

धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा

व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.

एखादा समाज किती पुढारलेला आहे त्या समाजात महिला किती शिकलेल्या आहेत यावरून ठरतं.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी