Mahatma Gandhi Death Anniversary : मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांचा आज स ७४ वा स्मृतीदिन. गांधी यांचा जन्म गुजरातच्या पोरबंदर येथे २ ऑक्टोबर रोजी १८९६ रोजी झाला होता. गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य नेते होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला गांधींनी प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने गोळ्या घालून गांधींना ठार केले.