Annna Bhau Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर करा मराठी अभिवादनपर संदेश

तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. 

anna bhau sathe
अण्णा भाऊ साठे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे.
  • अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत.
  • अण्णा भाऊ यांच्या पुण्यतिथीमित्ताने त्यांच्या कविता आणि विचार शेअर करून त्यांना अभिवादन करूया.

Annna Bhau Sathe : मुंबई : तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता अण्णा भाऊ साठे यांचे फार शिक्षण झाले नव्हते. तरी त्यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत. अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते.  वारणेचा वाघ, विजयंता, फकीरा, इभ्रत या कादंबरीवर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. आज अण्णा भाऊ यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या कविता आणि विचार शेअर करून त्यांना अभिवादन करूया.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।। गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।। अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.

ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंडीची, दाढ़ीची, हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची | पुस्तकांच्या थडीची

 

भांडवलशाहीचा चिवट केणा

वरवर छाटलाय तरी जाईना

अन जराशी बी शेती पिकू देईना

उपटून मुळी घाल पायदळी

तुडवून आला गेला रे शिवारी चला ॥

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी