Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes : १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशमधील महु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. संविधानाचे शिल्पकार अशी बाबासाहेबांची ओळख आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकावरच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तसेच बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेवर प्रहार करून स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवण्याचे महत्कार्य केले. चवदार तळ्यातील पाणी पिऊन त्यांनी अस्पृश्यांनाही पाणी पिण्याचा हक्क आहे हे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री होती, त्यांनी या देशाला संविधान दिले. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. आज १४ एप्रिल त्यांची जयंती आहे, या निमित्ताने त्यांच्या जयंतीच्या मराठी शुभेच्छा सोशल मीडियावर शेअर करा
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले.
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं.
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
मान वरून करुन जगायला शिकावलं भीमाने,
शिक्षणाचे महत्त्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले ज्याने,
माझे शत नमन त्याचे चरणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा