Subhash Chandra Bose Birth Anniversary 2022 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त शेअर करा आदरांजली संदेश आणि त्यांचे विचार

सुभाषचंद्र बोस यांचा जम्न २३ जानेवारी १८९७ रोजी झाला. बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. लोकांनी त्यांना ‘नेताजी’  ही उपाधी दिली.

Subhash Chandra Bose
सुभाषचंद्र बोस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुभाषचंद्र बोस यांचा जम्न २३ जानेवारी १८९७ रोजी झाला.
  • बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते.
  • लोकांनी त्यांना ‘नेताजी’  ही उपाधी दिली.

Subhash Chandra Bose Birth Anniversary 2022 : सुभाषचंद्र बोस यांचा जम्न २३ जानेवारी १८९७ रोजी झाला. बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते.  लोकांनी त्यांना ‘नेताजी’  ही उपाधी दिली. सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला. आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत. रॉवेंशा विद्यालयाचे मुख्याध्यापक बेनी माधवदास यांचाही त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. सुभाषबाबूंचे एकूण जीवनच देशभक्त क्रांतिकारकाचे व म्हणून रोमांचकारी आहे. परदेशात जाऊन इतर मित्रराष्ट्रांच्या साह्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले, हे त्यांच्या धडाडीचे, संघटना कौशल्याचे, समयसूचकतेचे व मुत्सद्देगिरीचे निदर्शक आहे. दास्यमुक्तीसाठी आणि नंतरच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यवाहीत आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. प्रकृतीची पुरेशी साथ नसतानाही त्यांनी उपोषण–निदर्शनांपासून सशस्त्र युद्धापर्यंतचे सर्व मार्ग आचरणात आणले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी