मराठी माणसाची आन, बान आणि शान असलेल्या राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. महाराष्ट्र शासनाच्या या जयंतीला किल्ले रायगडावर महाराजांना अभिवादन केले जाते. शासकिय नोंदीनुसार 19 फेब्रुवारी 1630 ही महाराजांची जन्म तारीख निश्चित करण्यात त्यानुसार आजच्या दिवशी शासकीय इतमामात महाराजांची जयंती साजरी केली जाते.
महाराष्ट्रासाठी शिवराय हे वंदनीय आणि पूजनीय आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj) मराठी माणसाचे अस्तित्व या राजामुळे आज टीकून आहे . अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आदर्श अजूनही सध्याची पिढी पुढे घेऊ जात आहे. ज्यांनी मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार रोवला अशा शिवाजी महाराज यांची आज जयंती (Shivaji Maharaj Jayanti 2021). हा दिवस कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी सणापेक्षा कमी नाही. नुसते महाराजांचे नाव मनात आले तरी, जय भवानी जय शिवाजीची ललकार आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे, 19 रोजी साजरा केला जातो.
महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता म्हणूनच शिवप्रेमींसाठी हे ठिकाण एखाद्या मंदिरासारखे आहे. महाराजांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्माण केला. सिंधुदूर्गातील मालवण किल्ल्यावर महाराजांच्या पाऊल खुणा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच त्यांचे एक मंदिर या ठिकाणी बांधण्यात आले आहे. तर अशा शिव जयंतीला खास मराठी HD Images, Greetings, Wishes, Messages, Facebook आणि Whatsapp Status शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.
सौजन्य ट्विटर
सौजन्य ट्विटर
सौजन्य ट्विटर
दरम्यान, 1869 साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती.