Shiv Jayanti Tithi 2023 Images in Marathi : मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)... हे प्रत्येक मराठी माणसासाठी फक्त नाव नसून ती एक भावना आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवजयंती (Shivaji Maharaj Jayanti) वर्षातून दोन वेळा साजरी होते. एकदा तारखेनुसार, तर एकदा तिथीनुसार. तारखेनुसार दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येते. यंदा तिथीनुसार 10 मार्च रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.
शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी जिजाईच्या पोटी, शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. या देशाला अनेक राजे-महाराजे लाभले परंतु रयतेचा राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. महाराजांनी जात-पात सोडून अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन साम्राज्य उभे केले. ते नेहमी जिद्दीने, चातुर्याने आणि निर्भिडपणे शत्रूला सामोरे गेले. राज्याला लाभलेले अभेद्य किल्ल्याने वैभव आणि समुद्रातील आरमार ही महाराजांचीच देण होय.
तर शिवजयंती निमित्ताने आपल्या जवळच्या लोकांना WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन आणि साजरा करा तिथीनुसार शिवजन्मोत्सव.
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती,
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती,
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय...!
निधड्या छातीचा, दणकट कणांचा
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा
माय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठा
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
एक विचार समतेचा, एक विचार नितीचा,
ना धर्माचा, ना जातीचा... माझा राजा फक्त मातीचा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरून अनेक वर्षे वाद चालू आहे. फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (19 फेब्रुवारी 1630) आणि वैशाख शुद्ध द्वीतिया शके 1549 (6 एप्रिल 1927) या दोन तारखांवरून हे वाद चालू आहेत.
याबाबत महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती, त्यांनी दिलेल्या अहवालानंतर शासकीय दृष्ट्या 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती. राज्यात अनेक ठिकाणी तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी.